spot_img
spot_img

आजचा दिवस कसा जाणार तो पाहूया

मेष –

मेष राशीसाठी वेळ चांगली असून जोडीदाराती साथ असल्यामुळे काही गोष्टी पटापट मार्गी लागतील. राशीचा स्वामी मंगळ केतू आणि गुरूसोबत असल्याने नात्यांमधील कटुता दूर करून गोडवा निर्माण करण्याची कला तुम्हाला शिकावी लागेल. मुलांकडून काही निराशाजनक बातमी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, संध्याकाळी खूप दिवसांपासून थांबलेली कामे मार्गी लागणार आहेत. रात्रीचा वेळ प्रियजनांच्या भेटीगाठी आणि आनंदी वातावरण असल्याने मानसिक समाधान मिळेल.

वृषभ  – 

वृषभ राशीसाठी सोमवार समाधान आणि शांततेचा असेल. राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. व्यवसायातील नवीन डिलमुळे पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. शासन आणि सत्ताधारी पक्षाशी असलेल्या संबंधांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याचा योग आहे. मात्र, रात्रीच्या वेळी असे काही लोक भेटतील ज्यामुळे तुम्हाला विनाकारण मनस्ताप सहन करावा लागू शकतो. अशा वेळी त्या लोकांकडे दुर्लक्ष करणे चांगले आहे.

मिथुन  – 

मिथुन राशीसाठी सोमवार ठिक असेल. राशीस्वामी बुधाची शुभ स्थिती तुम्हाला लाभ देईल. तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करत असाल तर उत्तम यश मिळेल. हरवलेली एखादी वस्तू पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मुलांच्या शिक्षणात किंवा स्पर्धेत अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाल्याने आनंद द्विगुणीत होईल. संध्याकाळी अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होणार आहे. रात्रीचा वेळ आनंदात जाणार आहे.

कर्क – 

कर्क राशीच्या लोकांसाठी सोमवार प्रगतीकारक आणि मेहनतीचा असेल. चंद्र दहाव्या स्थानात असल्यामुळे नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात चांगली प्रगती होण्याचे योग आहेत. मान-सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. मुलांशी संबंधित जबाबदारी पूर्ण करण्यात यश मिळू शकते. प्रवासाचे योग असून प्रवास सुखद आणि लाभदायक ठरेल. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत प्रिय व्यक्तींची भेट होईल. त्यांच्याकडून एखादी आनंदाची बातमीही मिळू शकते.

सिंह  – 

सिंह राशीचा स्वामी सूर्य सध्या मंगळाच्या वृश्चिक राशीत भ्रमण करत आहे. त्यामुळे मिळकतीचे नवे मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यातील गोडवा आणि संयमी स्वभावामुळे मान-सन्मान मिळेल. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात विशेष यश मिळण्याचे योग आहेत. मात्र, सूर्याच्या प्रभावामुळे धावपळ वाढू शकते. डोळ्यांशी संबंधित त्रास होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्या. विरोधकांचा काहीही त्रास होणार नाही.

कन्या  – 

कन्या राशीच्या लोकांसाठी सोमवार भाग्याची साथ घेऊन येणार आहे. राशीस्वामी बुधामुळे नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात सुरू असलेल्या प्रयत्नांना अनपेक्षित यश मिळू शकते. मुलांकडूनही समाधानकारक आणि आनंदाची बातमी मिळण्याचे योग आहेत. दुपारनंतर कायदेशीर वाद किंवा न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन प्रसन्न होईल. शुभ कामांवर खर्च होणार असून मानसन्मान वाढेल.

तूळ  –

तूळ राशीच्या लोकांसाठी सोमवार आनंद घेवून येत आहे. घरातील सर्व सदस्यांच्या आनंदात वाढ होईल. अनेक दिवसांपासून पैशांच्या देवाणघेवाणीवरून सुरू असलेली मोठी समस्या सुटण्याची शक्यता आहे. हातात पुरेसा पैसा आल्यामुळे आर्थिक समाधान मिळेल. विरोधकांचा त्रास कमी असेल. जवळच्या किंवा दूरच्या प्रवासाचे योग आहे पण काही कारणाने ऐनवेळी हा प्रवास पुढे ढकलला जाऊ शकतो. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि नात्यांमध्ये जवळीक वाढेल.

वृश्चिक – 

वृश्चिक राशीच्या जातकांनी सोमवारी तब्येतीची खास काळजी घ्यायला हवी. तुमच्या राशीपासून वक्री शनी पाचव्या स्थानात, तर चंद्र सहाव्या स्थानात असल्याने काही शारीरिक त्रास जाणवू शकतात. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला लाभदायक असेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल आणि मान-सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांची मदत मिळाल्याने प्रोजेक्ट पटापट मार्गी लागतील. मात्र, कामाचा ताण आणि जबाबदाऱ्यांचा व्याप कायम राहण्याची शक्यता आहे.

धनु –

धनु राशीच्या लोकांसाठी सोमवार ठिक असून विरोधकसुद्धा तुमचे कौतुक करतील. शासन आणि सत्ताधारी यांच्यासोबत तुमची चांगली ओळख असल्यामुळे काम पटापट मार्गी लागेल. सासरच्या मंडळींकडून पुरेशा प्रमाणात धनलाभ होण्याची शक्यता आहे. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी आहे.

मकर  – 

मकर राशीच्या लोकांना सोमवारी कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात सुरू असलेले नवे प्रयत्न यशस्वी होतील. सहकारी तुम्हाला मदत करतील आणि तुमच्या निर्णयात साथ देतील त्यामुळे प्रोजेक्ट पटापट पूर्ण होणार आहे. तुमच्याकडे जास्त प्रोजेक्ट दिले जात आहेत त्यामुळे आता टीम वाढविण्यावर भर द्यायला हवी. तुमचे मत वरिष्ठांकडे स्पष्ट मांडावे. संध्याकाळी कोणत्याही भांडणात किंवा वादविवादात पडू नका. रात्री पाहुण्यांच्या आगमनाचा योग आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!