नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ):- माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या नेवासा येथील जनसंपर्क कार्यालयात श्रींची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, आमदार शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतून नेवासा शहरातील गणेश मंडळाच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष व सदस्यांना कार्यालयातील श्री’च्या आरतीचा मान देण्यात आला आहे. नेवासेकरांनी या उपक्रमाचे स्वागत करून कौतुक केले आहे.
आमदार शंकरराव गडाख जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी दुपारी बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, ॲड काकासाहेब गायके, रवींद्र जोशी संजय सुखदान, सतीश पिंपळे, पोपट जिरे यांच्या हस्ते श्रीं ची प्रतिष्ठापना व आरती करण्यात आली. गुरू ऋषिकेश जोशी यांनी धार्मिक पौरोहित्य केले.
यावेळी राहुल देहडराय राजेंद्र मापारी, दिनेश व्यवहारे, सुनील धायजे, अंबादास इरले, संजय थोरात, जालिंदर गवळी, सुनील बोरुडे, संदीप म्हस्के, सुनिल साळुंके, गणेश कोरेकर, नितीन गडाख, राजू परभळकर, निलेश जगताप, ॲड. मयूर वाखुरे, संदीप इरले, बाबा कवडे, विनायक नळकांडे, भैय्या कावरे, अनिल परभने, आंबादास म्हस्के, दत्तात्रय मुळे, प्रसाद चौधरी, राहुल जाधव, गणेशोत्सवाचे समन्वयक प्रा. सुनील गर्जे, जयदीप जामदार, राजेंद्र लोखंडे, दत्तात्रय गडाख, तुषार परभणे, अमित जेधे यांच्यासह जय विरभद्र, एकलव्य आणि मध्यमेश्वर तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



