spot_img
spot_img

दिव्यांगाची गरज ओळखून मदत करण्याचे कार्य कौतुकास्पद ! दिलीपराव वारकर : टेके पाटील ट्रस्टकडून तीनचाकी सायकल भेट

कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) : – निसर्गाने तर आपणाला भरभरून दिलं. काहीही कमी केलं नाही पण, बाजूला कुणी दिव्यांग व्यक्ती असली की, आपण डोळेझाक करतो, काही वेळाने त्यांना विसरूनही जातो. पुढे कुणी म्हातारे आले की, आपणही काही वर्षाने म्हातारे होऊ हा विचारही मनाला शिवत नसतो. आपण आपल्याच धुंदीत बेमालूमपणे जगत असतो, परंतु; अशाही काळात दिव्यांगाची गरज ओळखून त्यांना मदत करण्याचे राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरोवद्गार वारी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी दिलीपराव वारकर यांनी काढले. 

कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथील निराधार दिव्यांग बांधव अशोकराव पांडव यांना राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने व दातृत्व जपणाऱ्या दात्यांच्या योगदानातून नुकतीच एक तीनचाकी सायकल मोफत भेट देण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी वारकर यांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले.

यावेळी सरपंच सतीशराव कानडे, बाजार समितीचे माजी सभापती सुरेश जाधव, भाऊसाहेब टेके, मधुकर टेके, नरेंद्र ललवाणी, मदन काबरा, ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टेके, रावसाहेब जगताप, पंडित लकारे, नवनाथ कवडे, ज्ञानेश्वर जाधव, संजय कवाडे, साहेबराव टेके, रवींद्र टेके, राजेंद्र ठाकूर, गणेश भाटी, अशोक निळे, प्रताप टेके, अंबादास गिरी, योगेश शिंदे, रावसाहेब वाघ, सतीश गायकवाड, सोमनाथ थोरात, संदीप आगे, मनोज जगधने, विलास जगधने, स्वप्निल टेके, पुरुषोत्तम टेके, सिद्धार्थ माने, अर्जुन तपासे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

माझे वय 61 वर्ष असून मी गेल्या वीस वर्षांपासून आजारी आहे. गेल्या सहा वर्षांपूर्वी माझा डावा पाय काढण्यात आला. तेव्हांपासून दैनंदिन जीवनात खास करून दळणवळणात खूप मनस्ताप सहन करावा लागला. शासनस्तरावर यासंबंधी मी वारंवार पाठपुरावा केला. परंतु; मला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील ट्रस्टकडे व्यथा मांडली असता त्यांनी आठच दिवसात मला मोफत सायकल उपलब्ध करून दिली. मी त्यांचा ऋणी आहे. 

– अशोकराव पांडव, दिव्यांग लाभार्थी, कान्हेगाव ता. कोपरगाव. 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!