हसनापूर (जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील हसनापूर येथे लहान चिमुकल्यांनी श्री गणेशाची स्थापना केली. हसनापूर गावातील बाळासाहेब नगर येथील अंगणवाडीमध्ये गणेश चतुर्थी निमित्त लहान चिमुकल्यांनी सहभाग घेत श्री गणेशाची वाजत गाजत मिरवणूक काढत स्थापना केली. कार्यक्रमात् हसनापूर येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य याचबरोबर गावातील थोर व लहान मंडळी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. दरवर्षी सालाबाद प्रमाणे श्री गणेशाची स्थापना केली जाते. परंतु यावेळी चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला त्यामुळे परिसरात आनंदमय वातावरण तयार झाले होते.
तसेच या कार्यक्रमाला बाळासाहेब नगर ,गोत्राल वस्ती येथील नागरिक व हसनापूर गावातील पदाधिकारी ,कार्यकर्ते हजर होते हसनापुर गावाचे उपसरपंच अफजल पटेल माजी सरपंच नासिर पटेल ,तंटामुक्ती अध्यक्ष झुल्फिकर पटेल यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता अंगणवाडी सेविका सौ. आसमा शेख मदतनीस सौ. सविता गोत्राळ यांनी विशेष परिश्रम घेतले.बाळ गोपाळ कार्यक्रमाचे आकर्षण बनले.



