श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा ):-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांदेगाव ता. राहुरी येथील प्रगतशील शेतकरी व केशव गोविंद विद्यालय बेलापूर खुर्द भाग शाळा आंबीचे पर्यवेक्षक चंद्रकांत भांड यांची कन्या डॉ. अक्षता भांड यांनी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन पशुधन विकास अधिकारी कृषी, पशुसंर्वधन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र अधिकारी वर्ग-१ पदावर निवड झाली आहे.
डॉ. अक्षता भांड यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परीषद प्राथमिक शाळा चांदेगाव तर माध्यमिक शिक्षक केशव गोविंद विद्यालय बेलापूर खुर्द व चंद्रेश्वर माध्यमिक विद्यालय चांदेगाव येथे पूर्ण झाले आहे. माध्यमिक शिक्षण घेत असतानाच प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून त्यादृष्टीने कठोर मेहनत, परिश्रम घेवून त्यांनी हे यश संपादन केले. चांदेगाव सारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेऊन पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परिक्षेत यश संपादन केल्यामुळे डॉ. अक्षता भांड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.




Total Users : 631633