श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुमनदेव, शाळेचा जागेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला. आज शाळे लगत असलेली जागा, परम पूज्य श्री शिवयोगी नटराज महाराज , सप्तलिंग शिवालय आश्रम. घुमनदेव यांनी शाळेस नवीन इमारत व मैदानासाठी दान दिली.
यासाठी आज सकाळी आश्रमात झालेल्या मीटिंगमध्ये महाराजांनी जागेचा व नवीन खोल्यांसाठीचा प्रश्न समजावून घेऊन आश्रमाची , घुमनदेव गावातील शिंदे परिवार . कांगुणे परिवार व खंडागळे परिवार यांच्या वतीने विठ्ठल मंदिरास मिळालेली मध्यवर्ती जागा जी शाळेला लागून आहे. त्यामध्ये विद्येचे मंदिर उभारण्यासाठी अत्यंत निर्मळ मनाने सर्वच सन्माननीय सदस्यांच्या समोर आश्वासन देऊन, ग्रामस्थांसह स्वतः जागेवर उपस्थित राहून पुढील कामासाठी भूमिपूजन करून शाळेला सुपूर्द केली.
गावातील समस्त सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांची उपस्थिती लाभली.
विठ्ठल मंदिरास मिळालेली जागा शाळेला दान मिळताना महाराजांनी व्यक्त केलेली भावना अत्यंत महत्त्वाची होती . धार्मिक मंदिरा इतकंच महत्त्वाचं ज्ञानाचे मंदिर इथे उभं राहावं असं त्यांनी बोलून दाखवलं. यासाठी गावातील सर्व सन्माननीय व्यक्तीं नी तसेच सर्वच पदाधिकाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची सामंजस्याची व सहकार्याची भूमिका घेतली त्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षक यांच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पप्पु महाराज, माजी सरपंच बाळासाहेब कांगुणे ,सोसायटीचे चेअरमन आबासाहेब कांगुणे सरपंच श्री श्रीपत गायकवाड उपसरपंच श्री गीताराम जाधव,माजी उपसरपंच रणजित बोडखे,सामाजिक कार्यकर्ते गंगा तात्या शिंदे,सागर वाघमारे,ज्येष्ठ मार्गदर्शक कचरू मामा खंडागळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री आबासाहेब शिंदे,उपाध्यक्ष श्री दत्तात्रय कांगुणें,श्री सागर कांगुणे ,अलंम शेख,आपामामा जाधव,काय्युंम भाई ,मुख्याध्यापक श्रीमती महापुरे मॅडम,शिक्षक श्री आनंद वाघ सर,श्री संजय शिंदे सर,साळुंके सर,कुंभार सर,बावचे सर,ई मान्यवर उपस्थित होते.




Total Users : 631627