spot_img
spot_img

मराठा आरक्षणासाठी शिवसेना जिल्हा प्रमुखाचा राजीनामा

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-मराठा आरक्षणासाठी मागील 5 दिवसापासून अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत श्री जरांगे  पाटील हे करत असलेल्या उपोषणाला महाराष्ट्रातील विविध भागातून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी श्री जरांगे यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषण सुरू झालेले आहेत या उपोषणामध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते हे सक्रियपणे सहभाग घेताना दिसून येत आहे या उपोषणाला व मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा एकमुखी निर्णय आज शिर्डी येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

याचाच एक भाग म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख श्री जितेंद्र जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे सदरील राजीनाम्यामध्ये त्यांनी म्हणले आहे की मागील काही दिवसापूर्वी श्री मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषण केलेले होते त्यानंतर सरकारने त्यांच्याकडे 40 दिवसाची वेळ मागून घेतलेली होती परंतु या 40 दिवसांमध्ये सरकारने आपला शब्द पाळला नाही त्यामुळे श्री जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषणास बसावे लागले.

आज आज उपोषणाचा पाचवा दिवस असून मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शिवसेना या पक्षाचे वैद्यकीय मदत पक्षाचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख पदावर काम न करण्याचा निर्णय श्री जितेंद्र जाधव यांनी घेतलेला आहे सदरील राजिनाम्याच्या प्रती त्यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ,खासदार श्री सदाशिव लोखंडे ,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्य प्रमुख श्री राम राऊत व शिवसेना जिल्हाप्रमुख श्री कमलाकर होते यांना पाठवण्यात आलेल्या आहेत

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!