spot_img
spot_img

शिर्डीला स्मार्ट सिटीचा दर्जा देऊन शिर्डीजवळ आयटी पार्क,व एम्स हॉस्पिटल उभारावे – खा. लोखंडे खासदार सदाशिव लोखंडे यांची पंतप्रधान मोदींकडे निवेदनाद्वारे मागणी

शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा ):-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी येथे आले असताना शिर्डी लोकसभा मतदार संघातील मागण्यांबाबत खा.सदाशिव लोखंडे यांनी पंतप्रधान मोदी यांचे शिर्डी विमानतळावर स्वागत करत त्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.व या निवेदनाद्वारे त्यांच्याकडे सह्याद्रीच्या घाट माथ्यावर पडणारे आणि पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडील गोदावरी खोऱ्यात वळविणे,

शिर्डी येथे आय. टी.पार्क उभारून जेणे करून या भागातील एक लाख सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार प्राप्त व्हावा.

देश विदेशातून शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना सुविधा मिळण्यासाठी शिर्डीकरांच्या मागणीप्रमाणे शिर्डीला स्मार्ट सिटीचां दर्जा देण्यात यावा.व शिर्डी येथे एम्स हॉस्पिटल उभारण्यात यावे. आदी मागण्या या निवेदनात करण्यात आले आहेत.व त्यासाठी आपण स्वतः लक्ष घालून प्रयत्न करावेत अशी विनंती करण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, नामदार राधाकृष्ण विखे पा.उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!