spot_img
spot_img

अहिल्यानगर अंगणवाडी कडे प्रशासनाचे दुर्लक्ष

नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- एकीकडे वाडी वस्तीवरील शाळा व अंगणवाडी स्मार्ट आणि डिजिटल होत आहेत. पण नेवासा शहरांमधील उपनगरातील अहिल्यानगर परिसरातील अंगणवाडी एखाद्या आदिवासी पाड्यापेक्षाही दयानीय अवस्थेत आहे. याची दखल आज पर्यंत सत्ता भोगलेल्या पदाधिकारी व सदस्यांनी कधीही घेतली नाही हे दिसून येत आहे.

कामगार आघाडी तालुकाध्यक्ष विवेक नन्नवरे यांच्या हे लक्षात आले असता अहिल्यानगर येथील अंगणवाडीला त्यांनी भेट दिली. अंगणवाडी सेविका सौ कल्पनाताई जामदार तसेच मदतनीस शुळ मावशी तिथे उपस्थित होत्या समवेत काही मुले देखील व मुलांचे पालक देखील या अंगणवाडीत उपस्थित होते .भेट दिल्यानंतर तिथे असे लक्षात आले की गेल्या काही वर्षापासून अहिल्यानगर येथे मुलांना बसण्यासाठी अंगणवाडीची खोली ही दुरावस्थेत आहे. अनेक पालकांनाही आपली मुले अंगणवाडीत पाठवायची आहे परंतु तिथे पाठवल्यानंतर त्या मुलांना बसण्यासाठी पुरेशी खोली देखील नाही त्यामुळे आपली मुलं अंगणवाडी पाठवण्यासाठी अंगणवाडीची दुरावस्था बघता पाठवण्याचे धाडस देखील होत नाही.अशा अवस्थेमुळे या लहान चिमुकल्यांची हाता हात होत आहे.

तिथल्या पालकांशी बोलताना अक्षरशा अंगावर शहारे येत होते. सुशिक्षित कॉलनी मध्ये खऱ्या अर्थाने शिकण्याकरता जर लहान मुलांना खोलीच नसेल तर खऱ्या अर्थाने आपण सुशिक्षित म्हणणे इतकी आपण योग्य आहोत का याची देखील मला आता लाज वाटत होती. अंगणवाडी सेविका यांना विचारणा करण्यात आल्या वर त्यांनी सांगितले मुलांची येण्याची फार इच्छा आहे अंगणवाडीत पण बसण्याकरता आमच्याकडे एवढी जागा नाही. त्यांना खेळण्याकरता सुरक्षितते कंपाऊंड नाही. त्यामुळे आम्हाला अंगणवाडी कशीतरी भरून द्यावी लागते. यामध्ये कधी जास्त मुले आले तर हाल होतात मुलांसाठी नवीन ऍक्टिव्हिटीज आम्हाला मुलांना देता येत नाही पावसाळ्यात अंगणवाडी भरणे हे फार मुश्कील आहे. पत्र्यांना दहा ठिकाणी होल असल्याकारणाने पावसाळ्यात ही अंगणवाडी पूर्ण आत मधून ओली होते. त्यामुळे मुलांना बसणं अशक्य होतं याचा परिणामामुळे मुलांना तिथे योग्य ते शिक्षण घेता येत नाही .

पहिले या अंगणवाडीत लसीकरण होत होते खोली अपुरी असल्यामुळे आता लसीकरण देखील बंद झाले आहे. अहिल्यानगर व परिसरातील सर्व छोट्या बालकांना आता रोड ओलांडून लांब जावे लागते. असे जर दिवस अन दिवस चालत राहिले तर एक दिवस ही अंगणवाडी बंद पडेल. व अहिल्यानगर रहिवाशांचे नुकसान होईल. हे होऊ नये म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही याच परिसरात लहानाचे मोठे झालो. व आपल्या परिसरातील या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी आम्ही बांधील आहोत असं समजून आम्ही आज अंगणवाडी पाहणी करता गेलो होतो.

अंगणवाडी सेविका संकल्पना ताई जामदार यांना शब्द दिला आहे. लवकरच तुमच्या अंगणवाडीच्या खोली प्रश्न हा मार्गी लावू. व तुम्हाला नवीन खोली देण्यासाठी जो काही प्रयत्न आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करता येईल तो आम्ही मनःपूर्वक पार पाडू. त्या आश्वासन भारतीय जनता पार्टी मी विवेक नन्नवरे कामगार आघाडी तालुकाध्यक्ष भाजपा म्हणून देत आहोत. आता अंगणवाडी जोपर्यंत अहिल्यानगर मध्ये होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावणार यावेळी श्री श्रीकांत बर्वे , संदीप भाऊ पारखे , व परिसरातील महिला भगिनी उपस्थित होत्या.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!