spot_img
spot_img

प्रवरेच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा शंभर टक्के

लोणी दि.१६ ( जनता आवाज वृत्तसेवा):- डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठामार्फत मे २०२३ घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टरचा लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रवींद्र जाधव यांनी दिली.

प्रथम वर्ष अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक कु वैष्णवी जनार्दन गायकवाड (८६.००%), द्वितीय क्रमांक कु अनुष्का साठे (८५.९५%), तृतीय क्रमांक कु वैष्णवी दिलीप कुलकर्णी (८५.४५%) उत्तीर्ण झाले आहे. यावर्षी प्रथम वर्ष फार्मसीचा निकाल १००% टक्के लागला आहे. यावर्षी अभ्यासक्रमातून एकूण ६८ विद्यार्थ्यापैकी ‌१९ विद्यार्थी विशेष प्राविण्य सह प्रथम श्रेणी, २२ विद्यार्थी प्रथम श्रेणी,१८ विद्यार्थी दुतीय श्रेणी उत्तीर्ण झाले आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, खासदार श्री डॉ सुजय विखे पाटील,सहसचिव भारत घोगरे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, फार्मसी चे डायरेक्टर डॉ बी.एम. पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रवींद्र जाधव, परीक्षा प्रमुख प्रा. गणेश शिंदे, सर्व शिक्षक, शिक्षकतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!