spot_img
spot_img

ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोहारे-मिरपूर येथे निळवंडे पाट पाण्याचे जल पूजन उत्साहात संपन्न लोहारे -मिरपुर ग्रामस्थांच्या वतीने ना. विखे पाटील यांचा सत्कार

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- निळवंडे धरणाचे पाणी कालव्‍यांच्‍या माध्‍यमातून गावात आले, हीच खरी आपल्‍यासाठी दिवाळी ठरली आहे. वर्षानुवर्षांची पाण्‍याची प्रतिक्षा आता संपली आहे. निळवंड्याचे पाणी मिळण्‍यासाठी राज्‍यात आपले सरकार सत्‍तेवर यावे लागले. शेवटच्‍या गावाला पाणी मिळेल असे नियोजन करण्‍यात आले असून, एकही शेतकरी पाण्‍यापासून वंचित राहणार नाही अशी ग्‍वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

तालुक्‍यातील लोहारे येथे मंत्री विखे पाटील यांच्‍या हस्‍ते निळवंडे पाण्‍याचे जलपुजन करण्‍यात आले. याप्रसंगी त्‍यांनी भारतीय जनता पार्टी लोहारे-मिरपूर ग्रामस्‍थांशी संवाद साधला. ग्रामस्‍थांच्‍या वतीने मंत्री विखे पाटील यांचे स्‍वागतही जल्‍लोषात करण्‍यात आले. लोहारे मधून भारतीय जनता पार्टीचे श्री सुदर्शन पोकळे, गुलाब पोकळे, अनिल पोकळे, नितीन पोकळे,अण्णासाहेब घुले, गणेश दिघे, नंदू पोकळे, भाऊराव पोकळे, सोपान पोकळे, योगेश पोकळे, वैभव पोकळे, गोकुळ पोकळे, अक्षय दुशिंग, किशोर दुशींग, साईनाथ दुशिंग, दत्तू पोकळे, मेजर प्रदीप पोकळे, बाबासाहेब घुले, रामनाथ पोकळे, सचिन पोकळे, शंकर रणमाळे, आकाश रणमाळे, गोकुळ रणमाळे, अण्णासाहेब सोमवंशी, विजय पोकळे, संपत पोकळे, दिलीप पोकळे, मच्छिंद्र पोकळे, दीपक पोकळे, विनोद पोकळे, माधव पोकळे, दत्तू सोनवणे, भिवा साबळे, नवनाथ पोकळे, साहेबराव पोकळे, मोहन मुर्तडक, घनश्याम भारस्कर, जालिंदर कापकर, शरद मुर्तडक, राजेंद्र रणमाळे, दत्तू रणमाळे, गणपत भोसले, ई. व सर्व भाजपाचे कार्यकर्ते आणि विविध गावांचे सरपंच आणि सदस्‍य मोठ्या सख्‍येने उपस्थित होते. प्रारंभी मंत्री विखे पाटील यांनी लोहारे गावचे ग्रामदैवत अवजीनाथ बाबा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्यास अभिवादन केले.

मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, निळवंडे धरणाच्‍या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले हेच आपल्‍या दृष्‍टीने मोठे भाग्य ठरले आहे. प्रधानमंत्री आल्‍याने धरणाच्‍या भविष्‍यातील कामासाठी कोणत्‍याही निधीची कमतरता पडणार नाही. डाव्‍या कालव्‍याप्रमाणेच उजव्‍या कालव्‍यातही लवकरच पाणी सोडण्‍याचे नियोजन आहे. अकोले तालुक्‍यातील उच्‍चस्‍तरीय कालव्‍यांचे कामही पुर्ण झाले असून, या कालव्‍यातूनही पाणी देण्‍याचे नियोजनही विभागाने केले आहे.

अनेक वर्षे सर्वच गावांना पाण्‍याची प्रतिक्षा होती. राज्‍यात युती सरकार आल्‍यानंतर या कामाला गती मिळाली. त्‍यामुळेच कालव्‍यांव्‍दारे पाणी येवू शकले, ही ख-याअर्थाने आपल्‍यासाठी दिवाळी ठरली आहे. आवर्तनाचा कालावधी वाढविल्‍यामुळे शेवटच्‍या गावाला पाणी देण्‍याचे नियोजन असून, जलसंपदा विभागाच्‍या आधिका-यांनीही रात्रंदिवस घेतलेल्‍या मेहनतीमुळे पाणी पोहोतच असल्‍याचे समाधान ना.विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केले. त्यानंतर भारतीय जनता पार्टी लोहारे-मिरपूर ग्रामस्थांच्या वतीने विखे पाटील साहेबांचा सत्कार व आभार व्यक्त करण्यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!