spot_img
spot_img

निवडणुकीपूर्वी आ. रोहित पवार यांचा माजी मंत्री आ. राम शिंदे यांना धक्का भाजपमधून अनेक जणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश 

कर्जत (जनता आवाज वृत्तसेवा):-निवडणुकीपूर्वी आमदार रोहित पवार यांचा माजी मंत्री आमदार राम शिंदे यांना धक्का . भाजपमधून अनेक जणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या असताना आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदार संघामध्ये राज्याची माजी मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे यांना धक्का दिला आहे.

तालुक्यातील दुधोडी या गावांमधील अनेक जणांनी आज रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये बाळासाहेब कोऱ्हाळे, राजेंद्र गोळे, दत्तात्रय परकाळे, दीपक कांबळे ,सागर कांबळे, बाळू रणधीरे, एडवोकेट विजय कानोळे बंडू शिंदे यांचा समावेश आहे.यावेळी दिपक शिंदे हे उपस्थित होते.

कर्जत जामखेड मतदार संघाची निवडणूक यावेळी मोठी चुरशीच होणार आहे. सोशल मीडिया व वैयक्तिक पातळीवर विविध कार्यक्रमांमधून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज रोहित पवार यांनी भाजपला धक्का देत दूधोडी या गावातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश करून घेतला आहे. यावेळी या सर्वांचे रोहित पवार यांनी स्वागत करत फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर आधारित सर्व जाती धर्मयांना सोबत घेऊन पुढील काळामध्ये सर्वांनी एकत्रित काम करूया असे यावेळी बोलताना सांगितले. दीपक शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की शरद पवार व रोहित पवार यांच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी आज भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून पुढील काळामध्ये अनेक जणांची प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होणार आहेत.

स्वाभिमानी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुढील काळामध्ये नक्कीच चांगला बहुमान येथे मिळणार आहे. आज सर्व स्वाभिमानी जनतेमध्ये कर्जत जामखेड मतदार संघात पुढील पिढ्यांचे भवितव्य कोणाच्या हातामध्ये द्यावयाचे याचा निर्णय आजच झालेला आहे. आणि त्याचीच नांदी म्हणून आज अनेकांनी प्रवेश केला आहे अशी श्री शिंदे यावेळी म्हणाले.

 

 

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!