spot_img
spot_img

सेवा सोसायट्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरीता सहकार मंत्रालयाचे धोरण उपयुक्त ठरेल- माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):- विकास सोसायट्यांनी पूरक व्यवसाय सुरू करून उत्पन्नाचे नवे मार्ग सुरू केले पाहीजेत.केंद्र सरकाराने यासाठी धोरण घेतले असून सेवा सोसायट्यांच्या आर्थिक सक्षमीकरणा करीता सहकार मंत्रालयाचे धोरण उपयुक्त ठरेल असा विश्वास जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी व्यक्त केला.

लोणी बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीच्या १०१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी,जेष्ठ कार्यकर्ते किसनराव विखे,तंटामुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे,चेअरमन अशोकराव धावणे,व्हा.चेअरमन नाना म्हस्के,वसंतराव विखे,अनिल विखे,गणेश विखे,नामदेव वाबळे,अण्णा म्हस्के,बाळासाहेब वाबळे,नवनाथ विखे,दिलीपराव विखे,प्रवीण विखे,रवींद्र धावणे,दादासाहेब म्हस्के,बाळासाहेब मुसळे,उत्तमराव गुळवे,तालुका विकास अधिकारी सचिन तांबे,निरीक्षक अमोल पुलाटे,शाखाधिकारी अनुजा जोंधळे-म्हस्के आदींसह मान्यवर सभेला उपस्थित होते.

श्री. म्हस्के यावेळी म्हणाले की,विकास सोसायट्या पीक कर्जावर अवलंबून असतात.दुष्काळ,अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले तर कर्जाची वसुली होत नाही.त्यासाठी केंद्र सरकारने आता विकास सोसायट्यांना विविध व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे.त्याचा फायदा घेऊन लोणी बुद्रुक सोसायटीने व्यवसाय सुरू करण्यासाठी नियोजन करावे.संस्थेचे उत्पन्न वाढले तर सभासद,शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल.या सोसायटीने शंभर वर्षे पूर्ण केली असून या प्रदीर्घ काळात अनेक संचाक मंडळांनी उत्तम काम केल्याने संस्था सुस्थितीत राहिली.पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील,लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील,ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे भक्कम पाठबळ संस्थेच्या पाठीशी राहिल्याने संस्थेची भरभराट झाली.

सभासदांचा विश्वास टिकून ठेवण्यात संस्थेला यश आले आहे.प्रारंभी चेअरमन अशोकराव धावणे यांनी प्रास्ताविक व नोटिसचे वाचन केले.विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला.भागवतराव विखे,लक्ष्मण विखे व वसंतराव विखे या सभासदांनी सभेत मोलाच्या सूचना केल्या.संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.सारंगधर शंकर पा.म्हस्के(भाऊ)यांच्या स्मरणार्थ माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या वतीने गावातील तीन ऊस उत्पादक सभासदांना शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.विजया शिवाजी वाबळे(आडसाली),कविता विक्रम लगड(सुरू) आणि लिलाबाई पर्वत धावणे(खोडवा) या पिकांचे सर्वाधिक उत्पादन घेतल्याबद्दल स्मृती चिन्ह व प्रत्येक ५ हजार रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.यावेळी संचालक भागवतराव विखे, प्रा.बाळासाहेब विखे,विष्णू विखे,भाऊ विखे,जालिंदर विखे,दिलीप विखे,राजकुमार गोसावी,सचिव गणेश बनगैय्या,महेंद्र गाढे,सुरेश विखे,अमोल बोर्डे यांच्यासह सभासद,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!