spot_img
spot_img

येत्या गळीत हंगामात ऊस पुरवठा करण्यासाठी ट्रक मालकांनी कारखाना-ट्रक मालक-मुकादम असा त्रिपक्षीय करार करावा- महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- विखे पाटील साखर कारखान्याला येत्या गळीत हंगामात ऊस पुरवठा करण्यासाठी ट्रक मालकांनी कारखाना-ट्रक मालक-मुकादम असा त्रिपक्षीय करार करण्याची सूचना महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

प्रवरानगर येथील आ.राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक्स वाहतूक संस्थेच्या ४७ व्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेत ना.विखे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नंदकुशोर राठी होते. ॲड.आप्पासाहेब दिघे,जेष्ठ कार्यकर्ते शांतीनाथ आहेर,बाबासाहेब दळे,संभाजी देवकर,साहेबराव दळे,विजयराव लगड, उपसभापती अण्णासाहेब कडू,सहा. निबंधक रावसाहेब खेडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना.विखे म्हणाले की,विखे कारखान्याच्या वाटचालीत गेली ४७ वर्षे ट्रक्स वाहतूक संस्थेचे मोलाचे योगदान राहिले आहे.राज्यातील अनेक साखर कारखाने ऊस पुरवठ्यासाठी एजन्सीची नेमणूक करतात.आपण मात्र ट्रक्स वाहतूक संस्थेच्या माध्यमातून हे करतो.काळ बदलला आहे.ट्रक्स मालकांनी ऊस पुरवठ्याची जबाबदारी घेतली पाहिजे.त्यासाठी कारखाना सर्वोतोपरी सहकार्य करीन. कारखाना-ट्रक मालक-मुकादम असा त्रिपक्षीय करार करून येत्या हंगामात ट्रक्स मालकांनी ऊस पुरवठ्याची जबाबदारी घ्यावी.हार्वेस्टरचा जास्तीत जास्त वापर करणे काळाची गरज आहे.कारखाना तुमच्या पाठीशी आहे.कार्यक्षमतेने ऊस वाहतूक करणे आवश्यक आहे.

ट्रक मालकांना या व्यवसायाचा मोठा अनुभव आहे.ट्रक्स घ्यायच्या असतील तर कारखाना मदत करायला तयार आहे. ट्रक्स वाहतूक संस्थेची यामध्ये महत्वाची भूमिका आहे.नंदकिशोर राठी यांचे संस्थेच्या विस्तारात मोलाचे योगदान आहे.अजूनही संस्थेने उत्पन्नाची नवीन साधने शोधण्याची आवश्यकता आहे.संचालक मंडळाच्या एकोप्यामुळे संस्थेची भरभराट होत असून ट्रक मालकांना त्याचा फायदा मिळत आहे.

प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष सुनील जाधव यांनी प्रास्ताविक केले.व्यवस्थापक जालिंदर खर्डे यांनी अहवाल वाचन केले. अहवाल सालात संस्थेला ६ लाख ४१ हजार रुपये नफा झाला आहे.सभासदांना १५ टक्के लाभांश,स्पेअर पार्टच्या रोख खरेदीवर ५ टक्के सूट व एकूण खरेदीवर ५ टक्के रिबेट दिले जाणार आहे.सभेला संचालक बाळासाहेब गोरे,प्रमोद नालकर,शिवाजी इलग, अलकाताई आरगडे, दत्तात्रय शिंदे,मारुती गायकवाड,मुकुंद तांबे,तबाजी लोखंडे,भारत वाकचौरे,वाहिद पटेल, मंदाबाई रांधवने, अशोकराव आहेर,पिरमहंमद पटेल,चंद्रकांत म्हस्के,ऊस विकास अधिकारी संजय मोरे यांच्यासह ट्रक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!