spot_img
spot_img

संगमनेरात अज्ञात लुटारूंनी टेम्पो चालकास लुटत केली मारहाण, एकाला घेतले ताब्यात कासारा दुमाला शिवारातील मालपाणी इस्टेटजवळ घडली घटना

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कासारा दुमाला शिवारात असणाऱ्या मालपाणी इस्टेट  जवळील मध्यरात्रीच्या सुमारास सर्विस रोडवरुन  संगमनेरकडे येणारा आयशर टेम्पो आला असता काही अज्ञात चोरट्यांनी त्या टेम्पोवर दगडफेक करत टेम्पो चालकाला लुटण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  

संगमनेर शहराजवळील  पुणे नाशिक राष्ट्रीय बायपास महामार्ग जात आहे या महामार्गावर अकोले रोडवरील मालपाणी इस्टेट जवळून संगमनेरकडे वाहनांना जाण्यासाठी सर्विस रोड तयार करण्यात आला आहे या रस्त्याने मध्यरात्रीच्यावेळी अनेक मालवाहतूक वाहने ये जा  करत असतात संगमनेर शहरातील इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या दिपक सुधाकर चव्हाण हे आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो एम एच १४बी जे २५६४ रविवारी पुण्याहून संगमरच्या दिशेने येत असताना अज्ञात लुटारुंनी त्या आयशर टेम्पोच्या काचेवर दगड फेकला असता टेम्पो चालकाने वाहनाचा वेग कमी केला त्याच वेळेस त्या टेम्पो चालकाला लुटण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी वाहनचालकाला खाली ओढून लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच वाहन चालकाचा मोबाईल काढून घेऊन तो फोडण्यात आला. तर इतर साथीदारांनी गाडीच्या केबिनमध्ये चढून गाडीतील ४ हजार रुपये रुपये लुटून लुटारू घटनास्थळावरून फरार झाले.

संगमनेर शहरालगत असणाऱ्या कासारा दुमाला शिवारात असणाऱ्या सर्विस रोड वरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना दमबाजी करत मध्यरात्रीच्या वेळी अनेक लुटारू अंधाराचा फायदा घेऊन वाहन चालकांना लुटण्याचा सर्रास प्रकार चालू आहे तरी शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत या परिसरामध्ये रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!