श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) :- श्रीरामपूर तालुक्यातील बाभळेश्वर – श्रीरामपूर रस्त्यांवरील नांदूर – ममदापूर परिसरात अंदाजे 30 वर्षीय एका अनोळखी तरुणांचा मृतदेह आढळून आला आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली असून मयताचे नाव व पत्ता अद्याप कोणतीही माहिती समजली नसून तो कोणत्या गावातील आहेत. तरुणाच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराच्या वार झाल्याच्या खुना असून डोक्याला ही जबरी मार लागल्याचे समजते .
स्थानिक गुन्हे शाखा व श्वान पथकाचे देखील घटनास्थळी पाचरण करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी शाळा सुटल्यानंतर घरी जाताना सदर मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला असल्याचे पाहिले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा मृतदेह हा नांदेड जिल्ह्यातील एका तरुणाचा असून तो छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसी भागात एका कंपनीत नोकरी करत असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.



