लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचारांची शिदोरी बरोबर घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत असताना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशील राहून या माध्यमातून आदर्श युवा पिढी घडवण्याचा मानस लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी व्यक्त केला.
लोकगीते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून डॉ. सुष्मिता विखे पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम म्हणून साजरा करण्यात आला . या निमित्ताने प्रवरा पब्लिक स्कूल लोणी या ठिकाणी वृक्षारोपण तर बाभळेश्वर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयातील कर्णबधीर आणि अंध युनिट या ठिकाणच्या विद्यार्थ्यांसोबत डॉ. विखे पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम म्हणून साजरा करत असताना या विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्याच्या वितरणाबरोबरच त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करून त्यांना वेगळा आनंद देण्यात आला . यावेळी संस्थेचे संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ संस्थेचे शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, प्रवरा कृषि शास्ञ संस्थेचे संचालक डाॅ.उत्तमराव कदम, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे यांच्यासह प्राचार्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांची संवाद साधताना डॉ. विखे पाटील म्हणाल्या की, प्रवरेच्या माध्यमातून सक्षम पिढी घडावे हा मानस जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा राहिला आहे. याच माध्यमातून विविध उपक्रम संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे.यासाठी शिक्षक आणि पालक यांचाही सहभाग लाभत आहे.
भारतीय संस्कृतीचे जतन होत असतानाच भारतीय संस्कृतीचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे सणवार उत्सव भारतीय संस्कृतीची जडणघडण असणारे सांस्कृतिक कार्यक्रम आगळा वेगळा गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या विद्यार्थी हा नोकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा ठरावा यासाठी प्रवरा बिल्डिंग उपक्रम, प्रवरेच्या शैक्षणिक संकुलामध्ये शिकत असणारे विद्यार्थी हे शेतकऱ्यांची आहेत त्याच दृष्टीने त्यांना ज्ञान त्यांना शेतीचे नवे तंत्रज्ञान मिळावे त्यांनाही शेतीमध्ये आवड निर्माण व्हावी या दृष्टीने वेळोवेळी कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या माध्यमातून शिवार फेरीचे ही आयोजन केले होत असल्याचे त्यांनी सांगितले सांगून वाढदिवसाच्या माध्यमातून मुलांबरोबर वेळ घालवता आला हे समाधान मोठे असल्याचेही डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.




Total Users : 614220