लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे कावळ्यांच्या तावडीतून दुर्मिळ गव्हाणी घुबड पक्षास वाचवण्यात डॉ. राजीव आहेर यांना यश आले.
लोणी खुर्द येथील डॉ. राजीव यांच्या वस्तीवर दहा बारा कावळ्यांनी घुबड पक्षास घेरून जायबंदी करण्याचे काम चालु होते. दहा बारा कावळ्यांचा कलकलाट एकुण डॉ राजीव बाहेर आले असता त्यांना कावळे घुबडाच्या मागे लागुन जखमी करताना दिसले. त्यांनी ताबडतोब सर्व कावळ्यांना पिटाळून लावले व घाबरतच जखमी घुबड पक्षास क्रेट खाली डालून ठेवले व प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली.
सदर घटनेची माहिती मिळताच प्राणीमित्र विकास म्हस्के व ग्रा.स. प्रविन विखे हे स्पॉट वर गेले. जखमी गव्हाणी घुबड पक्षास व्यवस्थित रेस्क्यु करत लोणी पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांतजी घोरपडे यांनी वैद्यकीय परीक्षण करून उपचार केले.उपचार केल्यानंतर जखमी गव्हाणी घुबड पक्षास प्राणीमित्र विकास म्हस्के यांच्या निर्मल निसर्गोपचार केंद्रात दाखल केले.
घुबड पक्षाविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. त्याचं तोंड पाहिल्यास अघटीत घटना घडतात. घुबड अशुभ आहे. परंतु घुबड हा पक्षी उंदरांचा कर्दनकाळ आहे. त्याचं मुख्य अन्न उंदीर असल्याने तो उंदरांचा नायनाट करतो. अन्न धान्य नासाडीपासून तो शेतकऱ्यांना वाचवतो म्हणून खऱ्या अर्थाने घुबड हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे.
या वेळी जखमी घुबड पक्षास वाचवल्याबद्दल प्राणीमित्र यांनी डॉ.आहेर व त्यांच्या कुटुंबाचे आभार मानले.जखमी घुबड पक्षास काही काळ वैद्यकीय उपचार करून व संगोपन करून निसर्ग सानिध्यात मुक्त करण्यात येणार आहे असे प्राणीमित्र विकास म्हस्के यांनी सांगितले.यावेळी डॉ राजीव आहेर, .प्रविण विखे, सोमनाथ रकताटे , अनिकेत विखे, गिरीष आहेर उपस्थित होते.




Total Users : 613654