लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-धरण समूहातील पाणी शेतीसाठी उन्हाळ्या पर्यत पुरविण्याचे मोठे आव्हान आहे.महापालिकेला होणारा पाणी पुरवठा आणि प्रक्रीया करून सोडण्यात येणारे पाणी याची आकडेवारी कधीतरी समोर आली पाहीजे. बिगर सिंचनाचे वाढते प्रमाण चिंतेची बाब ठरत आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी गोदावरी वाॅटर ग्रीड योजना कार्यान्वित करण्याचा विचार जलसंपदा विभाग करीत असल्याचे सुतोवाच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
आज नाशिक महानगरपालिका सभागृहात जिल्हा प्रशासन, नाशिक महानगरपालिका व जलसंपदा विभागाच्या अधिकारी यांच्या समवेत आयोजित बैठकीत मंत्री विखे पाटील पाण्याचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
बैठकीला आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. सरोज आहिरे, विभागीय आयुक्त डॉ प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी जलाज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त अजित निकत, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता पाणी पुरवठा अविनाश धनाइत, कार्यकारी अभियंता रविंद्र धारणाकर,बाजीराव माळी,गणेश मैड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, पाणी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पाण्याचे नियोजन लक्षात घेता 7.2 टी.सी.एम पाण्याचा महापालिका क्षेत्रात वापर होतो. नदीपात्रात जवळपास 65 टक्के प्रक्रिया करून प्रवाहित करणे अपेक्षित आहे. परंतु तसे निदर्शनास येत नाही यासाठी सर्वच महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत यांचा आढावा घेतला जात असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
येत्या तीन महिन्यांत नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या सर्व व्हॉल्व्हचे तातडीने मिटरींग करण्यात यावे, त्यामुळे मंजूर पाण्यापैकी नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या पाण्याची तफावत दूर होण्यास मदत होईल आशी अपेक्षा व्यक्त करून. आज आशा पध्दतीची पाणी मोजण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.
जवळपास 20 टक्के प्रक्रिया न केलेले पाणी नदी प्रवाहात सोडले जाते या दुषित पाण्यामुळे पाणवेलींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या नदीपात्रावरील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नगरपालिका व ग्रामपंचायत यांचे जलसाठेही प्रदुषित होत असल्याचे गांभीर्य अधोरेखीत करून,यासाठी सर्वच महानगरपालिका नगरपालिका यांनी तातडीने शाश्वत उपायोजना करण्याबबात आपण सूचना दिल्या असल्याचे , जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.
आगामी कुंभमेळाच्या दृष्टीने अनेक प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.सर्व आमदार निधीच्या उपलब्तेसाठी पाठपुरावा करतील. पाण्याचा काटकसरीने वापर झाला पाहिजे,असलेल्या कालव्यांची आवस्थाही जीर्ण असल्याने यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न आहे. शहरातही काही भागात कमी-अधिक प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. यासाठी महापालिका क्षेत्रात पाण्याचे योग्य परिक्षण होणे गरजेचे असून शहरासाठी 100 टक्के मीटरींग प्रक्रिया जलदपणे लागू केल्यास पाण्याच्या अतिरिक्त होणाऱ्या अपव्ययावर निर्बंध येण्यासाठी महापालिका प्रशासनास सूचना केल्या असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
शेतीचे सरंक्षण करणे हे आपले प्रमुख दायित्व असून शेतीसाठी पाणी सिंचनास प्राधान्य देवून पाणी आवर्तनात होणारी पाणीगळती टाळण्याच्या दृष्टीनेही उपायोजना करण्यासाठी अहिल्यानगर व नाशिक साठी गोदावरी आराखड्यात प्रवाहातून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी गोदावरी वाॅटर ग्रीड योजना कार्यान्वित करून पाईपलाईन पाणी पुरवठा करण्यातचे नियोजन आहे. यासाठी नियमाक मंडळाला सल्लागार नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यांचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील नियोजन करण्याचा प्राधान्यक्रम असेल. शेती सिंचनास पाण्यास अधिक वाव मिळेल. दारणा धरणातून थेट पाईपलाईन महानगरपालिका व जलसंपदा विभागाने समनवयाने आराखडा तयार करावा. अशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी बैठकीत दिल्या.




Total Users : 623967