श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-श्रीरामपुर विभागामध्ये अजय भंगाळे हे कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाल्यापासून त्यांचे कामामध्ये सुसूत्रता नसून हुकुमशाही व दडपशाही पदधतीच्या कामकाजामुळे श्रीरामपुर विभागामध्ये कार्यरत असणारे तांत्रिक कामगार त्यांच्या कामकाजाच्या शैलीमुळे मानसिक तणावाखाली जाऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊन आत्महत्या करत आहेत. मागील दोन-तीन वर्षापूर्वी श्रीरामपुर विभागामध्ये कार्यरत 1) कै. श्री. संदीप मधुकर पाटोळे प्रधान तंत्रज्ञ 2) कै. श्री. संतोष उत्तम तागड वरिष्ठ तंत्रज्ञ 3) कै. श्री. नारायण घोरपडे वरिष्ठ तंत्रज्ञ 4) श्री. सचिन वानखेडे वरिष्ठ तंत्रज्ञ. 5 ) श्री. सतीश नामदेव तिडके वरिष्ठ तंत्रज्ञ वरील 1 ते 3 कर्मचारी यांनी श्री. अजय भंगाळे कार्यकारी अभियंता श्रीरामपुर विभाग यांचे सततच्या मानसिक छळाला कंटाळून स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या आहेत.
तसेच सचिन वानखेडे यांना महावितरण कंपनीमधून कायमचे काढून टाकले आहे. आणि सतीश नामदेव तिडके वरिष्ठ तंत्रज्ञ यांना देखील महावितरण कंपनीच्या सेवेमधून कायमचे काढून का टाकण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे. अजय भंगाळे यांच्यावर कारवाई करुन त्यांना निलंबित करावे, या मागणीसाठी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना तांत्रिक कामगार युनियन (5059) च्या वतीने निवेदन देवुन जिल्ह्यातील वीजबिल वसुली बंद ठेवुन जिल्ह्यातील सर्व कार्यालयात निदर्शने करण्यात आले.
यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व विभागीय कार्यालयात, उपविभागीय कार्यालय, कक्ष अभियंता यांना तांत्रिक कामगार युनियनच्या नोटिसचे निवेदन देवुन सर्व कार्यालयामध्ये वसुली याद्या जमा करुन वसुली काम बंद ठेवण्यात आले.
यावेळी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक भुमिका घेवून लवकरात लवकर पूर्ण कारवाई करु असे आश्वासन तांत्रिक कामगार युनियनचे राज्य सचिव रघुनाथ तात्या लाड, प्रादेशिक अध्यक्ष विक्रम कोके, अहिल्यानगर सर्कल सचिव सचिन सुडके व अर्बन विभागीय अध्यक्ष राजेंद्र जायभाये यांना दिले.
निवेदनात म्हटले की, श्रीरामपूर विभागातील ठेकेदार यांच्याकडून वीज कर्मचारी यांना मारहाण बाबत संघटनेकडून लेखी तक्रार व एफ. आर. आय. प्रत श्री. अजय भंगाळे कार्यकारी अभियंता श्रीरामपुर विभाग यांना देवूनही अद्यापपर्यंत ठेकेदार यांच्याशी आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी संबधित विद्युत कंत्राटदार यांचेवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालत आजतगायत श्रीरामपुर विभागात दुरुस्ती व देखबाल संदर्भातील कामे दिली जात आहेत. व आजही संबधित कंत्राटदार श्रीरामपुर विभागामध्ये साहेबांच्या आशीर्वादाने काम करत आहेत. याबाबत आजपर्यंत संबधित कंत्राटदार यांचेवर कारवाई का करण्यात आली नाही ? याबाबत सखोल चौकशी करून संबधित भ्रष्ट्राचारी अजय भंगाळे कार्यकारी अभियंता श्रीरामपुर विभाग यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी ही मागणीही करण्यात आली आहे.
अजय भंगाळे कार्यकारी अभियंता श्रीरामपुर विभाग यांनी आपल्या विभागामध्ये आजपर्यंत तीन निरपराध कर्मचारी यांचा मानसिक छळ करून त्यांना महावितरण कंपनीच्या सेवेमधून कायमस्वरूपी बेकादेशीररित्या महावितरण कंपनीमधून कायमस्वरूपी काढून टाकल्यामुळे सदर कर्मचारी यांनी आत्महत्या केली आहे. तसेच अजूनही सतिश तिडके या कर्मचार्यावर महावितरण कंपनीमधून कायम स्वरूपी काढून टाकणे बाबत लेखी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे अशा नराधम अजय भंगाळे कार्यकारी अभियंता श्रीरामपुर विभाग यांचेवर वरील घटनेचा विचार करता त्यांच्यावर तातडीने कारवाई होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी यापूर्वी कै. श्री. संदीप पाटोळे प्रधान तंत्रज्ञ प्रकरण यामध्ये चौकशी दरम्यान कै. पाटोळे यांच्या बनावट सह्या मारलेल्या आहेत तसा फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाला आहे. तसेच विद्युत ठेकेदार यांच्यासाठी श्री. एम. आर. येलपल्ले कार्यकरी अभियंता चाचणी विभाग अहिल्यानगर यांच्या बनावट स्वाक्षरी केलेले प्रकरण त्यांनी दडपले आहे. त्यामुळे अजय भंगाळे कार्यकारी अभियंता श्रीरामपुर विभाग हे कै. श्री. संतोष तागड वरिष्ठ तंत्रज्ञ यांनी दिनांक 20.02.2025 रोजी आत्महत्या प्रकरणांतील दस्तावेजा मध्ये बनावट कागदपत्रे सादर करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयन्त करतील व पुरावे नष्ट करतील त्यामुळे अजय भंगाळे कार्यकारी अभियंता श्रीरामपुर विभाग यांचेवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी तांत्रिक कामगार युनियन (5059) अहिल्यानगर मंडळ मधील सर्व तांत्रिक कामगार वीजबिल वसुली यादी आपल्या कक्ष अभियंत्याकडे जमा करून वसुली बंद आंदोलन करत आहेत. तसेच दिनांक 11 मार्च 2025 पासून वीजबिल वसुली बंद ठेवुन तीव्र स्वरुपाचे काम बंद आंदोलन व साखळी उपोषण करण्यात येणार आहे. आंदोलन करण्यात येईल.
वीजबिल वसुली बंद करूनही प्रशासनाने अजय भंगाळे कार्यकारी अभियंता श्रीरामपुर विभाग यांचेवर तात्काळ निलंबनाची कारवाई न केल्यास आमची तांत्रिक कामगार कामबंद आंदोलन व साखळी उपोषण आपल्या अहिल्यानगर मंडळ कार्यालयासमोर करण्यात येईल. अशा वेळेस उद्भवणार्या औद्यागिक अशांततेस आपण व आपले प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असे ही संघटनेच्यावतीने इशारा देण्यात आला.




Total Users : 624729