राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):- मागील काही दिवसांपासून मा सुप्रीम कोर्ट आणि जिल्हाधिकारी यांचे आदेशाने सर्वत्र अतिक्रमण कारवाई हि मोठ्या प्रमाणात सुरु आहे याचाच एक भाग म्हणून राहाता शहरातील चितळी रोड,कोपरगाव नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमनावर हातोडा प्रशासना कडून मागील पंधरा दिवसांपासून टाकण्यात येत आहे.
यात छोटे व मोठे व्यापारी यांचे व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक तसेच आर्थिक नुकसान झाले आहे काही छोटे दुकानदार यांना तर अक्षरश आपले व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे व त्यांचे वर उपासमारीचे संकट निर्माण झाली आहे वर्षानुवर्षे छोटे मोठे दुकानदार आपले व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते परंतु प्रशासनाने केलेल्या कारवाई मुले दुकानदार अक्षरश रस्त्यावर आले आहे साकुरी ग्रामपंचायत हद्दीत सुद्धा अतिक्रमन निघणार अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.
साकुरीतील कात नाल्या लगत असलेला इरिगेशन विभागाच्या जागेत छोटे मोठे व्यापारी मागील पन्नास ते साठ वर्षापासून आपले व्यवसाय करत असून याद्वारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे जर प्रशासनाने सदरील ठिकाणी कारवाई केली तर साकुरीतील मुख्य बाजार पेठ च नष्ट होणार आहे तसेच साकुरी गावठाणलगत असलेल्या काही दुकान दारांना सुद्धा ग्रामपंचायत मार्फत पुन्हा एकदा नोटीस निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे साकुरी गावातील मुख्य बाजार पेठेवर कुऱ्हाड कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली.
तालुक्यातील मोठ्या लोकसंखेचे गाव म्हणून साकुरी गावाची ओळख असून या गावामध्ये मशिनरी,शेती औजारे,शेती विषयक विविध साहित्य दुकाने,किराणादुकाने असे एक न अनेक व्यवसाय या बाजार पेठेत आहे जर प्रशासनाने अतिक्रमण कारवाई हि राबवली तर साकुरी गावातील सर्व बाजारपेठ उध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे जर भविष्यात प्रशासनाने कारवाई केलीच तर न्यायालयात जाण्याचा निर्णय काही व्यापाऱ्यांनी घेतला आहे.




Total Users : 624408