spot_img
spot_img

राहुरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना तणावाचे वातावरण, पोलीस बंदोबस्त वाढविला 

राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी शहरातील बुवासिंदबाबा मंदिर परिसरातील बुवासिंद बाबा तालीम संघात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांकडून काळे फासून विटंबना करण्यात आली. सदर घटना ही बुधवार दि. 26 मार्च दुपारी एक ते दीडच्या दरम्यान घडली आहे.

यावेळी बुवासिद बाबा परिसरातील तालमी भोवती शहरातील नागरिकांनी तसेच तरुणांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी तरुणांनी शिवाजी महाराज की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी शहरातील नागरिकांकडून आरोपींना लवकरात लवकर अटक होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी  पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे तसेच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे,रावसाहेब चाचा तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे, नंदकुमार तनपुरे, प्रकाश शेलार तसेच हिंदुत्ववादी संघटनेचे अनेक युवा कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने परिसरात गर्दी केली होती.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!