spot_img
spot_img

लोणी येथे जादूटोण्याचा प्रकार की अफवा?  पीव्हीपी  कॉलेज  चौकातील  घटना

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील पीव्हीपी कॉलेज चौकात जादूटोण्याचा प्रकार आहे की अफवा अशी चर्चा लोणी येथे झडत आहे. मंगळवारी समोर आला असून पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. लोणी येथील पीव्हीपी कॉलेज चौकात दोन टोपली भरलेली हळद-कुंकू आणि त्यांना टाचण्या लावलेल्या दिसून आल्या.

हा जादूटोण्याचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लोणी पोलिसांना माहिती दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लोणी खुर्द ग्रामपंचायतीची कचरा गोळा करणारी रिक्षा बोलावून घेतली आणि त्यात सर्व लिंबू आणि टोपल्या टाकून दिल्या. लोणी गाव हे शिक्षणाचे मोठे केंद्र आहे. या ठिकाणी असा प्रकार होणे धक्कादायक आहे.

हे कृत्य कुणी केले आणि कशासाठी केले याचा शोध लोणी पोलिसांनी घेणे आवश्यक आहे. लोणीतील सुज्ञ नागरिकांनी तशी मागणी केली असून पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित व्यक्तीचा शोध घ्यायला हवा.

लोणी येथील पीव्हीपी चौकामध्ये नेहमी वर्दळ  असते. त्यामुळे येथे असा प्रकार करण्याची कोणीही हिंमत करणार नाही. या चौकात सीसीटीव्ही सुद्धा बसविण्यात आलेले आहे. ही घटना खरंच जादूटोण्याची आहे की अफवा आहे. हे लवकरच पोलीस तपासातून उघड होईल.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!