spot_img
spot_img

प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या १४ विद्यार्थिनींना भारत सरकारची संस्कृत शिष्यवृत्ती प्राप्त 

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-भारत सरकारच्या संस्कृत संवर्धन योजनेअंतर्गत केंद्रीय संस्कृत विश्व विद्यालयाकडून पद्मभूषण लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या चौदा विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली.

संस्कृत विद्यापीठामार्फत बहुविध केंद्रीय योजना राबविण्यात येत आहेत या योजनेअंतर्गत सण २०२४-२५ या वर्षासाठी प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या एकूण चौदा विद्यार्थिनींना प्रत्येकी रुपये पाच हजार एवढी गुणवत्ता शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. अशी माहिती प्राचार्या सौ.भारती कुमकर यांनी दिली.

प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या माध्यमातून सक्षम विद्यार्थी घडावा यासाठी प्रयत्न केले जातात. इंग्रजी सोबतच मराठी ही ज्ञान देत असताना विद्यार्थिनींना संस्कृत विषयाचे देखील ज्ञान कन्या विद्या मंदिर च्या माध्यमातून दिले जाते. संस्कृत विषयात देखील प्रवरेच्या कन्या हे अव्वल स्थानावर राहिल्या आहेत. त्यांना संस्कृत शिक्षिका निशाली शेजुळ यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!