spot_img
spot_img

राहाता तालुक्यातील धनगरवाडीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी मृत्युमुखी

राहाता, (जनता आवाज वृत्तसेवा):-राहाता  तालुक्यातील  धनगरवाडी( दिघी रोड ) दत्त मंदिर येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी मृत्यू झाली असून या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले या परिसरात लवकरात पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्यात यावा अशी मागणी धनगरवाडी येथील नागरिकांनी केली आहे.

धनगरवाडी येथे संतोष राशिनकर यांच्या वस्तीजवळ रात्री नऊच्या सुमारास दबा धरून बसलेला बिबट्याने संतोष राशिनकर यांची मुलगी स्नेहल संतोष राशिनकर (वय ७ )तिला घरासमोरून पकडून शंभर फूट फरफटत नेले त्यानंतर त्या परिसरात आरडाओरड झाल्याने मुलीला सोडून बिबट्या पळून गेला त्यानंतर त्या मुलीला घेऊन प्रवरा हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले तसेच धनगरवाडीचे उपसरपंच साहेबराव आदमाने यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता रात्री अधिकारी संतोष राशिनकर यांच्या वस्तीवर येऊन वन विभागाचे अधिकारी श्री सानप, साखरे, बर्डे,  सुराशे यांनी घटनास्थळी पंचनामा केला

तरी या परिसरात लवकरात लवकर पिंजरा लावण्यात यावा व वन खात्याने दक्षता घ्यावी असे सरपंच उपसरपंच यांनी व नागरिकांनी म्हटले आहे.

गेले काही महिन्यापूर्वी  धनगरवाडी व त्या शेजारील चितळी परिसरामध्ये एक लहान बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर वन विभागाला अनेकदा पिंजरा लावण्याची मागणी करूनही त्यांनी याकडे दुर्लक्षित केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची वनविभागाविरुद्ध नाराजगीचा रोष वाढत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!