spot_img
spot_img

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ३:३० वाजेपर्यंत सरासरी ४८.४९ टक्के इतके मतदान

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, १५ जाने. २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजल्यापासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. म्हणजेच सकाळी ७:३० ते ३:३० या वेळेत शहरात सरासरी ४८.४९ टक्के इतके मतदान झाले असून मतदारांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

प्रशासनाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, दुपारी ३:३० वाजेपर्यंत एकूण १,४८,८५८ मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये ७७,६९५ पुरुष आणि ७१,१३३ महिला मतदारांचा समावेश आहे. सकाळी थंडीचा कडाका असूनही मतदानाची टक्केवारी समाधानकारक मानली जात आहे

शहराच्या विविध भागांत अनेक नागरिक सहकुटुंब मतदानासाठी बाहेर पडले होते. काही केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक आणि अपघातात जखमी झालेल्या मतदारांनी चक्क वॉकरचा आधार घेऊन मतदान केंद्रावर हजेरी लावली, जे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले.

 

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!