कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा) :- राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील प्रा. शरद मुसमाडे व सौ. संगीता मुसमाडे यांचे चिरंजीव प्रा. शुभम शरद मुसमाडे यांची केनिया या देशातील नैरोबी येथे ॲग्रीकल्चर रिसर्च सायंटिस्ट व प्रोडक्शन हेड या प्रतिष्ठित पदावर नियुक्ती झाली. या पार्श्वभूमीवर ते लवकरच केनियाला रवाना होणार आहेत. यानिमित्ताने तांभेरे ग्रामस्थांनी या भूमिपुत्राचा जाहीर नागरी सन्मान केला.
प्रा. शुभम मुसमाडे हे यापूर्वी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रीकल्चर सायन्सेस या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. प्रा. शुभम मुसमाडे यांनी प्राथमिक शिक्षण राहुरी फॅक्टरी येथील डि – पॉल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पूर्ण केल्यानंतर नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयात बी. एस्सी. ॲग्री पदवी प्राप्त केली. त्यानंतर परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठातील लातूर येथे ॲग्रीकल्चर एमबीए पदवी प्राप्त केली. येथे प्रा. शुभम मुसमाडे यांनी उच्चांकी गुण प्राप्त केल्याबद्दल त्यांना गोल्ड मेडल ( सुवर्णपदक ) देऊन सन्मानित करण्यात आले. मध्यंतरीच्या काळात त्यांनी स्पर्धा परिक्षेसाठीदेखील भरपूर मेहनत घेतली.
प्रा. शुभम मुसमाडे हे ज्येष्ठ पत्रकार स्व. दादासाहेब कोळसे तसेच स्व. हरिभाऊ मुसमाडे यांचे नातू आहेत. तसेच वैभव कोळसे आणि पत्रकार संजय कोळसे यांचे ते भाचे आहेत.
तांभेरे येथील ग्रामस्थांनी केनियाला रवाना होणाऱ्या प्रा. शुभम मुसमाडे या भूमीपुत्राचा तसेच त्यांच्या धर्मपत्नी सायली मुसमाडे यांचा जाहीर नागरी सन्मान केला. यावेळी पत्रकार संजय कोळसे, मेजर ताराचंद गागरे, सुनील गागरे, प्रा. सोपानराव शेलार, धर्मेंद्र मुसमाडे, विनोद मुसमाडे, प्रा. शरद मुसमाडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नारायणराव मुसमाडे, विश्वनाथ मुसमाडे, आदिनाथ मुसमाडे, संजय मुसमाडे, किरण ठोंबरे, बबनराव गागरे, दत्तात्रय मुसमाडे, विलास मुसमाडे, बाळासाहेब गागरे, पंढरीनाथ गागरे, ज्ञानदेव गागरे, सोन्याबापु मुसमाडे, सागर मुसमाडे, सनी कांबळे, चेतन लोंढे, ऋषिकेश मुसमाडे तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. याशिवाय कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थ, लोणी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, राहुरी येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय तसेच विविध संस्थांनी त्यांचा सत्कार व सन्मान केला.



