spot_img
spot_img

राहुरीचे अद्यावत बस स्थानकाचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करावे – माजी खा. प्रसाद तनपुरे

राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी येथील अद्यावत बस स्थानकाचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करावे येणाऱ्या सर्व अडचणीतून मार्ग काढून कामाला अधिक गती द्यावी यासाठी माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी आज शुक्रवारी बस स्थानकाला भेट देत विविध सूचना केल्या.

श्रीरामपूर आगाराचे प्रमुख  अनिल बेहेरे, विभागीय अभियंता संजय दरेकर, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपाध्यक्ष गजानन सातभाई ,नगरसेवक रवींद्र आहेर, आरिफ शेख , बबनराव गुलदगड , प्रदीप भुजाडी, सूर्यकांत भुजाडी, निलेश जगधने, दत्तात्रय येवले आदि उपस्थित होते.

गेल्या अनेक दिवसापासून राहुरी बस स्थानकाचे नव्याने काम सुरू आहे अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत कामाला प्रारंभ करण्यात आला होता . माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी प्रारंभापासूनच विविध ठिकाणी पाठपुरावा चालूच ठेवला होता.

बांधकामाला येणाऱ्या अडचणी, प्रवाशांची सुविधा, विविध परवानगी ,शासन स्तरावरील अडचणी ,विकासकाचे प्रलंबित काम यासाठी श्री तनपुरे यांनी विशेष लक्ष ठेवले होते. एक जुलै 2026 पर्यंत बस स्थानकाचे काम पूर्ण करावे यासाठी ठेकेदाराने वेगाने हालचाली करून प्रवाशांना लवकरात लवकर सुखकर प्रवासासाठी बस स्थानकातील सुविधांचा उपयोग होण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहावे. बस स्थानक परिसरातील ज्या ठिकाणी मोकळी जागा असेल तेथे राहुरी नगरपालिकेमार्फत वृक्षारोपण करून सुशोभीकरण केले जाणार आहे.

यासंबंधी श्री तनपुरे यांनी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे व उपस्थित नगरसेवकांना कोणत्या प्रकारची झाडे लावावी याचे मार्गदर्शन केले व आगामी पावसाळ्यातच वृक्ष लावण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या .प्रवाशांसाठी अद्यावत सुलभ शौचालय असावे यासाठी विशेष खबरदारी घ्यावी. पावसाळ्यात स्थानकात पाणी साठणार नाही त्या दृष्टीने पाणी वाहून जाण्यासाठी योग्य त्या उपाययोजना हाती घ्याव्यात .स्थानक परिसरात व्यापारी संकुलासाठी जेथे जागा निश्चित केलेली आहे

तेथेही कोणतीही अडचण निर्माण होणार नाही यासाठी आराखड्यात कोणताही बदल करू नये. जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले राहुरीतील बस स्थानक आकर्षक व स्वच्छ असावे अशी अपेक्षा श्री तनपुरे यांनी संबंधितांकडून व्यक्त केली. श्री तनपुरे यांच्या या सर्व सूचनांचे काटेकोर पालन केले जाईल असे विकासकाने सांगितले .परिवहन महामंडळ, नगरपालिका व ठेकेदार कंपनी यांनी एकत्रितपणे काम केल्याने कोणताही अडथळा येणार नाही याची खात्री देण्यात आली. स्थानकाच्या आतील सर्व पृष्ठभाग सिमेंट काँक्रीटने केलेला असल्याने विकासकाने आणखी कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!