spot_img
spot_img

..अखेर बेलापूर बहुचर्चित  ‘बाबा’ला पोलिसांच्या घेतलं ताब्यात

श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा) :-नाशिक, संगमनेरनंतर आता बेलापूर येथेही ‘बाबा’ प्रकरणाने वेग घेतला असून, संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. अंधश्रद्धा, फसवणूक किंवा अन्य प्रकारांच्या संशयावरून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.

नाशिक येथील खरात बाबा आणि संगमनेरमधील गडगेबाबा, भोसलेबाबा यांच्यावरील कारवाईनंतर बेलापूर येथील ‘बाबा’ संदर्भात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. विविध तक्रारी आणि आरोपांची दखल घेत पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवत संबंधित व्यक्तीवर लक्ष केंद्रित केले.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी पोलिसांनी बेलापूर येथील या ‘बाबा’ला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी सुरू असून, त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यात अशा प्रकारच्या ‘बाबा’ प्रकरणांवर पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू असून, अंधश्रद्धा व फसवणुकीच्या घटनांवर लगाम घालण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. बेलापूरमधील ही कारवाई त्या मालिकेतील पुढचा टप्पा मानला जात आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात चर्चा रंगल्या असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!