spot_img
spot_img

सालवडगावच्या शिवारात मध्यरात्रीचा पोलिसांचा धडाकेबाज छापा; अवैध मावा कारखाना उद्ध्वस्त ३१ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपी ताब्यात, आणखी दोघांची नावे निष्पन्न

शेवगाव(जनता आवाज वृत्तसेवा):-शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सालवडगाव शिवारात सुरू असलेल्या अवैध मावा निर्मितीच्या कारखान्यावर शेवगाव पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 31 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, आणखी दोघांची नावे तपासात समोर आली आहेत. अवैधरित्या सुगंधी तंबाखू मिश्रित मावा तयार करून विक्रीसाठी साठवणूक सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ही कारवाई केली..

मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर शेवगाव पोलिसांनी ही मोठी कारवाई उभी केली. दिनांक 20 मे 2026 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सालवडगाव परिसरात मशीनच्या सहाय्याने कच्ची व पक्की सुपारीमध्ये सुगंधी तंबाखू मिसळून मावा तयार केला जात आहे.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तातडीने तपास पथकाला पाचारण केले. दोन पंचांना सोबत घेत खाजगी वाहनातून पोलिसांनी सालवडगाव शिवारात छापा टाकला. यावेळी घटनास्थळी दोन इसम आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे इम्रान निसार शेख (वय 22) व सोहेल अफ्सर शेख (वय 21), दोघेही रा. सालवडगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर अशी सांगितली.

घटनास्थळी महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी व टाटा एसीई (छोटा हत्ती) वाहन उभे होते. वाहनांची झडती घेतली असता पोलिसांच्या हाती मोठ्या प्रमाणात मावा तयार करण्याचे साहित्य, सुपारी, तयार मावा, मशिनरी व वाहने मिळून आली.

जप्त मुद्देमालामध्ये मावा तयार करण्याच्या दोन मशिन, विविध प्रकारची सुपारी, तयार मावा, सुगंधी तंबाखूयुक्त साहित्य, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, बॅटरी, प्लास्टिक ड्रम, टब यांचा समावेश आहे. तसेच महिंद्रा पिकअप (एमएच 16 एई 6028) व टाटा एसीई (एमएच 14 ईएम 0971) ही वाहनेही जप्त करण्यात आली. संपूर्ण मुद्देमालाची किंमत 31 लाख 38 हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ताब्यातील आरोपींकडे चौकशी केली असता हा संपूर्ण माल मुज्जीप मुस्सा शेख व परवेज मुस्सा शेख, दोघे रा. शेवगाव यांचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार इम्रान निसार शेख, सोहेल अफ्सर शेख, मुज्जीप मुस्सा शेख व परवेज मुस्सा शेख या चौघांविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 427/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चंद्रकांत आंधळे यांनी दिली आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोसई बाजीराव सानप, पोसई रामहरी खेडकर, पोहेकॉ किशोर काळे, पोकॉ भगवान सानप, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ संपत खेडकर, पोकॉ एकनाथ गर्कळ, पोकॉ राहुल खेडकर, पोकॉ सचिन पिरगळ, पोकॉ रोहित पालवे, पोकॉ कृष्णा मोरे, पोकॉ प्रशांत आंधळे व पोकॉ अर्जुन मुंढे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोसई बाजीराव सानप हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!