spot_img
spot_img

दोन भाच्यासह मामाचा ट्रॅक्टर अपघातात मुत्यू  खरंवडी येथील घटना :, सोनईत शोककळा

सोनई( जनता आवाज वृत्तसेवा ) :- नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे झालेल्या भीषण ट्रॅक्टर अपघातात सोनईच्या दोन अल्पवयीन सख्ख्या भावांसह त्यांच्या मामाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे सोनई व खरवंडी परिसरात शोककळा पसरली आहेत.

सोनई येथील दत्तनगर परिसरातील प्रगतशील शेतकरी व दुग्ध व्यवसायिक गणेश दरंदले यांची मुले अभिषेक गणेश दरंदले (वय 16) व विजय गणेश दरंदले (वय 14) यांना शाळेला सुट्टी लागल्याने ते मंगळवारी सकाळी खरवंडी येथील त्यांचे मामा रामेश्वर बाळासाहेब मराठे यांच्याकडे गेले होते.सायंकाळच्या सुमारास खरवंडी परिसरातील खळवाडी भागात ट्रॅक्टरचा अपघात होऊन ट्रॅक्टर पलटी झाला.या दुर्घटनेत ट्रॅक्टरखाली तिघेही अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत ट्रॅक्टर सरळ करून तिघांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

नेवासा येथे शवविच्छेदनानंतर मंगळवारी सायंकाळी रामेश्वर मराठे यांच्यावर खरवंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर, बुधवारी सकाळी अभिषेक व विजय दरंदले या दोन्ही भावांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेची माहिती परिसरात पसरताच ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.अभिषेक व विजय हे प्रगतशील शेतकरी अर्जुन पाटीलबा दरंदले यांचे नातू तसेच, माजी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब दरंदले यांच्या कुटुंबातील होते.रामेश्वर मराठे हे बाळासाहेब मराठे यांचे एकुलते एक पुत्र होते, तर गणेश दरंदले यांनाही अभिषेक व विजय हिच दोन मुले होती. त्यामुळे या दुर्दैवी घटनेने दोन्ही कुटुंबांवर मोठा आघात झाला आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!