कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- कोपरगांव येथे वाळु वाहतुक करणारे वाहनांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, २ डंपर सह २१, ४०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हा शाखेला यश आले आहे
मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी हरिष भोये यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध रित्या शासकिय गौणखनिजाचे उत्खनन करुन वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशाप्रमाणे सपोनि हरिष भोये यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/दिपक मेढे, पोलीस अंमलदार सुनिल पवार, सुनिल मालणकर, बाळासाहेब गुंजाळ यांचे पथक तयार करुन सदर पथकास अवैधरित्या शासकिय गौणखनिजाचे उत्खनन करुन वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले.
पथकाने दिनांक ११ जून रोजी देर्डे फाटा, ता. कोपरगांव या ठिकाणी मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन छापा टाकुन वाळु वाहतुक करणारे इसम नामे 1) विकास बाळासाहेब आरणे (वय 32 वर्षे, रा. दहेगांव, ता. राहाता, जि. अहिल्यानगर,) 2) यश दत्तात्रय कोते( रा. शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) (फरार) यांचेविरुध्द कारवाई करुन त्यांचे कब्जातुन १२,००,०००/- रुपये किमतीचा डंपर क्रमांक एम.एच. १७ सी. व्ही. ७७१६, व २०,०००/- रुपये किमतीची 02 ब्रास शासकिय वाळु, जप्त करण्यात आली आहे.
तसेच दिनांक १३ जून रोजी वर नमुद पथक हे कोपरगांव तालुक्यामध्ये पेट्रोलिंग करत असतांना पथकास डाऊच गावचे शिवारामध्ये अवैध रित्या वाळु वाहतुक करणारा इसम नामे रविंद्र एकनाथ गायकवाड (वय २७ वर्षे, रा. कोकमठाण, ता. कोपरगांव, जि. अहिल्यानगर) याचेविरुध्द कारवाई करुन त्याचे कब्जातुन ९,00,000/- रुपये किमतीचा डंपर क्रमांक एम.एच. १४ एम.एच.८५२३ च २०, ०००/- रुपये किमतीची ०२ ब्रास शासकिय वाळु जप्त करण्यात आली आहे.
वरीलप्रमाणे दोन्ही कारवायामध्ये २१,४०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन ताब्यातील आरोपीविरुध्द कोपरगांव तालुका व कोपरगांव शहर पोलीस स्टेशन येथे अनुक्रमे गु.र.नं. २५०/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) सह पर्यावरण कायदा कलम 3/15 प्रमाणे व गु.र.नं. ३२३/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) सह पर्यावरण कायदा कलम ३/१५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.



