spot_img
spot_img

आढाळा कालव्याला पाणी सुटले,शेतकऱ्यांना दिलासा आ. अमोल खताळ यांच्याकडे  शेतकऱ्यांची मागणी, सकारात्मक प्रतिसाद 

संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा):- अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढाळा धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे , परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे मागणी केली त्यानुसार आढळा धरणातून कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय झाला , त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे शिवसेनाचे बापूसाहेब देशमुख यांनी सांगितले.

देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आढाळा धरणातील पाणीसाठा समाधान कारक झाल्यानंतर कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी परिसरातील अनेक शेतकरी करत होते. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ व जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. त्यानंतर तातडीने निर्णय घेत कालव्यात पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्यात.या पाण्याचा लाभ आढाळा कालव्याच्या लाभक्षेत्रातील हजारो एकर शेतीला होणार असून, खरीप हंगामातील पिकांना मोठा आधार मिळणार आहे.

सध्या मका, सोयाबीन,डाळिंब बाजरी,कांदा टोमॅटो भाजीपाला सह इतर पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने कालव्याचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आ. अमोल खताळ यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने केलेल्या पाठ पुराव्यामुळेच आढाळा कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय झाला असल्यामुळे परिसरातीलशेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचा शेतीला थेट फायदा होणार असल्याचा विश्वास बापूसाहेब देशमुख यांनी व्यक्त केला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!