spot_img
spot_img

टर्नचा अंदाज न आल्याने बुलेट गाडीचा नाऊर – हरेगाव रस्यावर भीषण अपघात राहुरी तालुक्यातील दोघे गंभीर जखमी,एकाची प्रकृती चिंताजनक

नाऊर( जनता आवाज वृत्तसेवा):- रा.मा.क्र. ५१ वरील श्रीरामपूर–वैजापूर मार्गावर नाऊर–हरेगाव रस्त्यावरील धोकादायक वळणावर बुलेटचा भीषण अपघात झाला असून टर्नचा अंदाज न आल्याने भरधाव बुलेट वरील चालकाचे नियंत्रण सुटून मोटारसायकल रस्त्याच्या कडेला जोरदार आदळली. या भीषण अपघातात राहुरी तालुक्यातील गडदे आखाडा येथील दोन युवक गंभीर जखमी झाले.

अपघातातील जखमींची नावे प्रशांत विटनोर आणि दादासाहेब कोळसे अशी असून, दोघेही राहुरी तालुक्यातील गडदे आखाडा येथील रहिवासी असल्याचे समजते. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की बुलेटचे मोठे नुकसान झाले असून दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार चालकाचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि बुलेट वेगाने रस्त्याबाहेर जाऊन आदळली. अपघाताचा आवाज ऐकताच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढत नागरिकांनी प्राथमिक मदत करून पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. एकाचा डोक्याला मोठा मार लागला असून हात पाय फ्रॅक्चर झाला आहे. तर दुसऱ्याच्या डोक्यातुन रक्तस्त्राव होत होता.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

या अपघातामुळे काही काळ श्रीरामपूर–वैजापूर मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. या राजमार्गावरील अनेक वळणे धोकादायक असुन आवश्यक इशारा फलक, टर्नला वाढलेली वृक्ष, रबर स्पीडब्रेकर, वेगमर्यादा आणि अन्य सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!