spot_img
spot_img

महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती सत्र

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग, अहिल्यानगर येथील वैद्यकीय-शल्य परिचर्या विभाग व महिला तक्रार निवारण कक्ष (Women Cell) यांच्या वतीने, बी.पी.एच.ई. सोसायटीचे अहमदनगर महाविद्यालय, अहिल्यानगर यांच्या सहकार्याने तसेच महाराष्ट्र सायबर व क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते.

ऐमन अत्तर यांनी आधुनिक आर्थिक फसवणूक, लक्ष्यित फसवणूक, प्रवेश व नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक, उपकरणांची सुरक्षितता, संकेतशब्द आणि सायबर कायद्याचे वास्तव याबाबत मार्गदर्शन केले. समृद्धी घोरपडे यांनी वास्तविक व आभासी अर्थव्यवस्था, कर्ज अॅप्समधील फसवणूक तसेच सामाजिक माध्यमांवरील धोके व सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास वैद्यकीय संचालक डॉ. अभिजीत दिवटे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. रामचंद्र पडळकर, प्राचार्य डॉ. प्रतिभा अरुण चांदेकर आणि उपप्राचार्य डॉ. योगिता औताडे यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागप्रमुख श्री. अमोल टेमकर, डॉ. निलेश म्हसके, वर्षा शिंदे, पूजा मोरे, प्रमोद सूर्यवंशी, रुशाली कुंजीर, प्रतीक्षा थोरात आणि सुदर्शन पाडेकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रुशाली कुंजीर यांनी, तर आभार प्रदर्शन प्रतीक्षा थोरात यांनी केले.

सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणारे हे सत्र विद्यार्थ्यांसह सर्व उपस्थितांसाठी माहितीपूर्ण व मार्गदर्शक ठरले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!