मेष –
मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे, जो उत्साह आणि आक्रमकतेचे प्रतीक मानला जातो. या राशीच्या लोकांनी सूर्यदेवाला अर्घ्य देताना पाण्यात तांबडी/लाल फुले अर्पण करावीत.
वृषभ –
वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे, जो प्रेम, काळजी आणि सौंदर्याचे प्रतिनिधित्व करतो. या लोकांनी सूर्यदेवाला जल अर्पण करताना पाण्यात थोडे दूध आणि साखर मिसळावी, तसेच सूर्य नारायण देवाच्या १२ नावांचा जप करावा.
मिथुन –
मिथुन राशीचा स्वामी बुद्धिमत्ता आणि संवादाचे प्रतीक असलेला बुध ग्रह आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी ब्रह्म मुहूर्तावर सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सूर्यनमस्कार घालावेत.
कर्क –
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, जो मन, भावना आणि संवेदनशीलतेशी संबंधित आहे. या राशीच्या लोकांनी ब्रह्म मुहूर्तावर ‘आदित्य हृदय स्तोत्रा’चे पठण करावे. यामुळे मनातील भीती दूर होईल आणि अति-संवेदनशीलता कमी होईल.
सिंह –
सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहे. सध्या सूर्य स्वतःच्याच राशीत गोचर करत असल्याने, उगवत्या सूर्याला गुळाचे पाणी अर्पण करून आणि सूर्याच्या १२ नावांचा जप करून सूर्यदेवाला प्रसन्न करण्याची ही अत्यंत उत्तम वेळ आहे.
कन्या –
कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. या राशीचे लोक शिस्तबद्ध आणि परिपूर्णतेचा शोध घेणारे असतात. या लोकांनी गणपती बाप्पाला दुर्वा वाहून त्यांची पूजा करावी.
तूळ –
तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या राशीच्या लोकांनी कष्टाळू आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांचा आदर करावा आणि त्यांना गोड पदार्थ खायला द्यावेत. यामुळे तुम्हाला समाजात आदर-सन्मान मिळेल.
वृश्चिक –
वृश्चिक राशीचा स्वामी ऊर्जा आणि निर्भयतेचे प्रतीक असलेला मंगळ ग्रह आहे. या राशीच्या लोकांनी भटक्या प्राण्यांना किंवा कुत्र्यांना अन्न खाऊ घालावे. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होण्यास मदत होईल.
धनु –
धनु राशीचा स्वामी ज्ञान आणि स्वातंत्र्याचा कारक असलेला गुरु (बृहस्पती) ग्रह आहे. या राशीच्या लोकांनी गुरुवारी भगवान गणपतीला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. यामुळे आयुष्यात भाग्य आणि यश लाभेल.
मकर –
मकर राशीचा स्वामी महत्त्वाकांक्षा आणि व्यावहारिकतेचा कारक शनि ग्रह आहे. या लोकांनी गरजू व्यक्तींना पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या कपड्यांचे दान करावे. यामुळे तुमची आंतरिक उर्जा आणि शक्ती वाढेल.
कुंभ –
कुंभ राशीचा स्वामी कर्म आणि न्यायप्रिय असलेला शनि ग्रह आहे. या राशीच्या व्यक्तींनी रोज सकाळी ‘गणपती अथर्वशीर्ष’चे पठण करावे आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.
मीन –
मीन राशीचा स्वामी भावनिक आणि अध्यात्मिक गुण असलेला गुरु ग्रह आहे. या लोकांनी मंदिरात मातीचे दिवे दान करावेत आणि सूर्यदेवाच्या १२ नावांचा जप करावा.




Total Users : 616409