spot_img
spot_img

अहिल्यानगरमध्ये पत्रकारावर हल्ला ! वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून १० ते १२ जणांकडून मारहाण

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणातून झालेल्या वादानंतर एका वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सुशिल थोरात यांच्यावर १० ते १२ जणांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी (ता.२०) सायंकाळी पाइपलाइन रस्त्यावर घडली. या हल्ल्यात थोरात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, वाहनाच्या धक्क्यावरून थोरात यांचा काही जणांशी वाद झाला. त्यानंतर वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यांच्यासह १० ते १२ जणांनी थोरात यांना मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे तसेच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेमागील नेमके कारण आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींबाबत माहिती घेतली जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!