कृषी…सहकार.. पुण्यपद मिरासीचा… निष्ठावान पाईक -आदरणीय काकासाहेब शिंदे
वीणा गवाणकर यांचा ‘ एक होता कार्व्हर (जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर) हे अमेरिकेचे पहिले कृषी शास्त्रज्ञ व संशोधक..निसर्गावर…मातीवर… मनस्वी प्रेम करत…निसर्गाचे बारीक निरीक्षण करणारे…निसर्ग पुत्र होते.
अगदी त्यांच्या शेती..माती.. विषयाच्या बांधिलकीचं मूर्तिमंत रूप म्हणजे आदरणीय काकासाहेब शिंदे साहेब…
माय..माती.. मातीतील माणसावर त्यांच्यातील माणूसपणावर… भरभरून प्रेम करणारं…निरपेक्ष माणूसपण जपत …आपल्यावरील आपल्या आई वडिलांच्या …स्व.घुले पाटील साहेबांच्या संस्कारांच अत्यंत कृतज्ञतेने ……………अभिमानाने….. त्यांच पाईकपण जपणारा.. सहकारातील शेवटचा
विश्वासू समन्वयक…उदार अंत:कारणाचा कृषीतज्ञ….कृषी वाटाड्या.
नेवासे तालुक्यातील सामाजिक,कृषी, सहकार, सांस्कृतिक व आध्यात्मिक क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या,”शिंदे परिवाराची” एक सुसंस्कृत आदर्श समाजशील व लोकाभिमुख परिवार” अशी वेगळी ओळख आहे.
ती ज्यांच्या आचार,विचार व संस्कारावर निर्माण झाली ती …. स्व.आबासाहेब ज्ञानदेव शिंदे(तात्या)व कै. शांताबाई आबासाहेब शिंदे(माई)या दाम्पत्याच्या ध्येयप्रेरीत जीवनामुळे..
सुरेगाव सारख्या खेड्यामध्यें स्वतःच्या प्रपंच्या बरोबरचं”गाव पाटील”…उपाधी ..
ऐवजी”एक गुड ह्युमन बिंग”…म्हणून गावगाड्यातील”रंजल्या गांजल्याना”…
अडीअडचणीत.. आपुलकीने मदतीचा हात देत तात्यांनी माणुसकी धर्म निभावला.
सचोटीने प्रपंच करित,आचार विचार व संस्कारांचा वारसा देत मुलांना खऱ्या अर्थाने सुशिक्षित केले.
त्या परिवारातील…ज्येष्ठ पुत्र…काकासाहेब.
आपल्या आई वडिलांच घरातील व गावगाड्यातील.. पंचक्रोशीतील स्थान … लौकिक…अवलोकन करीत…त्या काळी ते कृषी पदवीधर झाले.
अर्थात डॉक्टर, इंजिनिअर व शासकीय प्रशासकीय अधिकारी ते सहज झाले असते..परंतु ते झाले सहकारातील प्रशासकीय अधिकारी.. की जिथं स्थैर्य…शाश्वत विकासाची कुठलीही हमी नाही…
स्व.तात्यांच्या घरातील सदाचाराच्या…. व कुलीन संस्कारात..घडलेल्या… उच्च विभूषित काकासाहेबांवर नजर पडली लोकनेते स्व.मारुतरावजी घुले पाटील यांची.
रत्न पारखी स्व.साहेबांनी या तरुणाची शेतीशी असलेली नैसर्गिक नाळ व त्याच्यातील सद्गुणांवर.. घराण्याच्या संस्कारावर…उमेदीवर…. विश्वास दाखवत…त्यांना संत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सेवेत सामावून घेतलं.
*शांती रूपे नव्हे!कोणाचा वाईट!वाढवी महत्व!वडिलांचे!!*
याची सदैव जाणिव ठेवत..ते कार्यरत झाले.
ज्ञानेश्वर उद्योग समूह…२४ +७ त्यांच्या जीवनाचा ध्यास झाला……वेळ…काळ… मर्यादेचं … कुठलं ही बंधन न ठेवता समर्पित भावनेनं त्यांनी शेवट पर्यंत सर्वस्व झोकून देत… स्व.साहेबांच्या विश्वासास पात्र राहण्याचा प्रयत्न केला..
त्यास काळ साक्षी आहे….ज्यांनी ज्यांनी त्यांना पाहिलं… जाणलं…अनुभवलं.. त्या सर्वांची ही भावना आहे.
सहकारी साखर कारखाना हा आपल्या परिसराची *कामधेनू* आहे या स्व.साहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून…शेतकरी..व कारखाना यांच्यामध्ये संवाद ठेवत…त्यांच्या अडीअडचणी समजून घेत… कारखाना व त्यांच्यात एक प्रकारे आपुलकी…जिव्हाळा निर्माण करीत दोघांचे ही हित साधण्याचा.. सदोदीत प्रयत्न त्यांनी शेवटपर्यंत केला.. हे त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे.
हे करीत असताना.. जगा मध्ये….देश पातळीवर…शेती मधील..ऊसाच्या.. फळ ..भाजीपाला उत्पदान्न वाढी संदर्भात..आलेलं नवीन तंत्रज्ञान…सुधारणा… बी बियाणे…खते..जिवाणू..जीवनसत्वयुक्त… मूलद्रव्यांची माहिती त्यांच्या पर्यंत नेण्याचा प्रयत्न… त्यांनी कृषी मेळावे…राज्यातील विविध कृषी विद्यापीठांचे कृषी संशोधक व त्यांचे नविन संशोधनाचे प्रेझेंटेशन… कृषी प्रदर्शनास सहल भेटी..कृषी प्रदर्शनाचे आयोजन करीत…अत्यंत तळमळीने ..त्यांना कृषी साक्षर करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. तो त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता…त्यामागे शेतकऱ्यांचं पिढ्यानपिढ्यांच आर्थिक प्राक्तन जावून त्यांच्या जीवनात बदल व्हावा ही आंतरिक ओढ होती.संत ज्ञानेश्वर कारखान्यावरील व दहीगावने येथील अद्यावत कृषी विज्ञान केंद्र व त्यामाध्यमातून ज्या सेवा सुविधा दिल्या गेल्या… दिल्या जात आहेत.. हे त्यांच्या महत्त्वाच्या योगदानाची प्रतिक आहेत.
याच बरोबर त्यांनी उमेदीच्या काळापासून ते अखेरपर्यंत…शेवगाव,नेवासा,नगर जिल्ह्यातीलच नव्हेतर अवघ्या महाराष्ट्रातील स्व.घुले पाटील साहेबांच्या समकक्ष नेते, स्व.साहेबांच्या बरोबर असणारे कार्यकर्ते..त्यांची पिढी..साहेबांना मार्गदर्शन करणारी जेष्ठ पिढी..
स्व.साहेबांचे स्नेही..आप्तेष्ट………सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते………..संघर्षचळवळीतील नेते..कार्यकर्ते… समाजातील अध्यात्मिक परमार्थिक क्षेत्रातील महनीय… साहित्यिक,पत्रकार, कलाकार… त्या त्या क्षेत्रातील विद्वान..अभिजन… उद्योजक….सर्वांशी साहेबांच्या स्नेहमय वलयांकित..जीवनातून.. संस्कारातून .. निर्माण झालेला स्नेह… सुखं दुःखाच्या प्रसंगी संवेदनशीलतेने जपत.. वृद्धिंगत करीत…ते ऋणानुबंध दृढ केले.त्यांच्या व साहेबांच्या पश्चात..पुढच्या पिढीत व त्यांच्यात आपुलकीचा जिव्हाळ्याचा स्नेहबंध निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी शेवट पर्यंत अत्यंत नैसर्गिक जिव्हाळ्याने केला.
स्व. साहेब व त्यांच्या विश्वासाप्रती कृतज्ञतेने त्यांनी दिलेलं ते खऱ्या अर्थानं “अर्ध्य” आहे..
या सर्व कार्यकाळात त्यांनी आपल्या परिवारातील सर्वांच्या शिक्षण..व वैवाहिक जबाबदाऱ्यांनाही त्यांनी न्याय दिला.
सर्व बंधू उच्च विभूषित आसून समाज जीवनात त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात प्रथितयश तर आहेतच..परंतु
आज “बदलत्या प्रदूषित उथळ माहोल”मध्ये तात्या व माईंची ही पिढी अ-नगर,पुणे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्या मध्यें संस्कारक्षम.. आदर्श आचरणाने आध्यत्मिक व सामाजिक जीवनात महत्वाचे योगदान देत,”आदर्श समाज निर्माण”कार्यात कार्यरत आहेत.
या परिवाराची वाटचाल”कृतार्थतेची व वैभवी” अशी आहे..यामागे अत्यंत संपन्न..समृद्ध.. आचार.. विचार.. संस्काराचा..मिळालेला वारसा आदरणीय काकासाहेब शिंदे साहेब यांनी जपलाच.. नाहीतर आपल्या चांगुलपणाने.. अविरत सायासाने…धडपडीने तो वृद्धिंगत ही केला.
माती..मातीतील माणसं..कारखान्याचे सर्व सभासद… शेतकरी…प्रामुख्यानं गंगेच्या काठावरील.. गंगथडी सदोदीत त्यांच्या आपुलकीचा……….जिव्हाळ्याचा व त्यांच्या आत्यंतिक प्रेमाचा धागा होता.तो शेवट पर्यंत त्यांनी मनापासून कृतिशीलपणे… जपला.
मग शेतीची पाणी परवानगी असेल..विजेचा प्रश्न असेल..जायकवाडी धरणग्रस्तांच्या प्रशासकीय अडीअडचणी असतील..अतिरिक्त ऊसाचा प्रश्न असेल.. एक ना अनेक प्रश्न असतील… अर्थिक अडचणी असतील… आपल्या परीनं… तात्यांच्या आपुलकीनं… त्यांनी सर्वोपरी साह्य करीत योगदान दिले.
भविष्यात गंगथडीच्या काठावर एवढा मनापासून प्रेम करणारा शिंदे साहेबा सारखा कार्व्हर क्वचितच होईल….
त्यांनी अचानक घेतलेली एक्झिट..सर्वांनाच धक्कादायक व चटका लावणारी…
शेती..सहकार..व लोकनेते स्व.मारुतरावजी घुले पाटील संत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचा विषय असेल… तुमच्या स्मरणा शिवाय.. त्यास पूर्णत्व नाही…यामध्येच आपल्या संपूर्ण योगदानाचं मोठेपण सामावलं आहे.
दुःखद अंत:करणाने…
दशक्रियाविधी निमित्त-संत ज्ञानेश्वर महाराज..भगवान श्रीरामकृष्ण विवेकानंद आश्रम-भक्तमंडळाच्या .. समर्पणच्या…..व आमच्या सुकाळकर परिवाराच्या वतीनं आदरणीय काकासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
श्री.संजय आशादेवी सर्जेराव सुकाळकर.
नेवासा.




Total Users : 619889