श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे एका २७ वर्षीय तरुणाचा संशयास्पद घातपात घडल्याची घटना घडली आहे . याप्रकरणी पोलीसांनी दोघांना ताब्यात आहे. आशिष उर्फ लाल्या विजय पारखे (वय २७, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) असे मयत तरुणाचे नाव आहेत.
मात्र, कालरात्रीच्या सुमारास आशिषचा याचा मृतदेह पडवीत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. मयत आशिषच्या मानेवर जबरी धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी सुरू असून. मयताचे वडील विजय पारखे यांनी मात्र आशिषच्या जवळच्या व्यक्तींवर संशय व्यक्त करत मारेकर्यांनी आशिषला जबर मारहाण करून रात्री मृतदेह पडवीत आणून टाकला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी भेट दिली. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस तपासाअंतीच खूनाचे नेमके कारण आणि सत्य बाहेर येणार आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.




Total Users : 642018