spot_img
spot_img

गणेशोत्सवानिमित्त अनिल महाराज देवळेकर यांचे सोमवारी कीर्तन 

संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर शहरानजीक असलेल्या घुलेवाडी येथे गणेशोत्सवानिमित्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तरुण मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कीर्तनाचे आयोजन केले आहे. याच उपक्रमांतर्गत सोमवार, दि.२१सप्टेंबर२०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता हिंदुत्ववादी कीर्तनकार अनिल महाराज देवळेकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

घुलेवाडी येथील आमदार अमोल खताळ पाटील यांच्या निवासस्थानी समोरील परिसरात हे कीर्तन होणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमातून भक्ती, अध्यात्म आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्यात येणार आहे. अनिल महाराज देवळेकर यांच्या प्रभावी कीर्तनातून उपस्थित भाविकांना छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास उलगडून दाखविणार आहे

या कीर्तन कार्यक्रमास घुलेवाडी तसेच संगमनेर शहर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तरुण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!