श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या पुण्यिथीनिमित्त तालुक्यातील रांजणखोल येथे कृषि विभागाकडून शेती माहिती मेळावा आयोजित करण्यात आला होता. परिसरातील शेतकरी बांधवाना कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची सखोल माहिती देण्यात आली तसेच राज्य पुरस्कृत मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत सोयाबीनची शेती शाळा घेण्यात आली.
यावेळी शेती शाळेत सोयाबिन पीक कीड रोगविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांचे सोयाबीन प्लॉट वर जाऊन प्रत्यक्ष विविध रोगा संदर्भासह उत्पादन वाढीसाठी उपाययोजना सांगून मोफत औषध वाटप करण्यात आले.
या मेळाव्यात बियाणे, खते, औषधे, ठिबक- तुषार, जलसंधारण, फळबाग लागवड योजना, कृषि विभागाच्या विविध योजनेची माहिती देऊन शेतकरी फक्त कुटुंबाचाच नव्हे तर जगाचा पोशिंदा आहे आणि बदलत्या ऋतूनुसार शेती तंत्रज्ञान अंगिकरणे काळाची गरज आहे. पिकांच्या सुधारित जाती, शेती औजारांचा वापर याबाबींवर भर देणे व एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केल्याने खर्च कमी करून जास्त उत्पन्न मिळावा असे आवाहन शेवटी कृषी विभागाकडून करण्यात आले.
हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कृषी विभागाच्या विविध विविध योजनेचे जागृतीसाठी 18 ऑगस्ट 24 ऑगस्ट दरम्यान कृषी माहिती मेळावा अभियाना अंतर्गत रांजणखोल येथे आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना रामपूरवाडीचे कृषी अधिकारी किरण धुमाळ, कृषी पर्यवेक्षक श्रीमती वैशाली अडसुरे, रांजणखोलच्या कृषी सहाय्यक श्रीमती शीला लाटे यांनी विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास पाटील ढोकचौळे, बाबासाहेब पाटील ढोकचौळे, आप्पासाहेब डांगे, शिवाजीराव दौंड, अमर ढोकचौळे, सुभाषराव गायकवाड, निळे सर,
सागर ढोकचौळे, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य शेती कमिटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्व सदस्य व कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार आर. आर. ढोकचौळे व दिलीपराव अभंग यांनी मानले



