मेष रास –
मानापमानाच्या कल्पना टोकदार न करणे हे तुमच्याच हातात राहील आनंदी स्वभावामुळे आजूबाजूचे वातावरणही अल्हाददायक राहील.
वृषभ रास –
दुसऱ्याच्या स्वभावाचा अचूक अंदाज घ्याल आणि त्याप्रमाणे आपली वागणूक ठरवाल.
मिथुन रास –
नोकरी व्यवसाय थोडा मानसिक त्रास झाला तरी काम चालू ठेवाल तुमच्या बुद्धीचा वापर जेव्हा वेगळ्या गोष्टी करण्याकडे जास्त राहील.
कर्क रास –
काही वक्ते निष्काळजीपणा दाखवल्यामुळे घरामध्ये वाद विवाद होतील महिलांचे विचार एकांगी असतील.
सिंह रास –
तुमच्या जीवनातील कोणाचेही वर्चस्व तुम्ही कधीच सहन करणार नाही या स्वभावामुळे कधी कधी अडचणीत सापडाल.
कन्या रास –
प्रत्येक गोष्टीमध्ये आता ताईपणा करून चालत नाही हे लक्षात ठेवावे लागेल काही वेळेस त्या गोष्टी फायद्याच्याही ठरू शकतात.
तूळ रास –
तुमच्याकडे जी कला आहे त्या कलेचा ध्यास जर तुम्ही घेतला तर त्यातून तुम्हाला मिळणाऱ्या आनंदाची बरोबरी कोणत्याही गोष्टीशी होऊ शकणार नाही.
वृश्चिक रास –
इच्छाशक्ती चांगली राहील त्यामुळे मानसिक ताकद वाढेल भरपूर काम कराल.
धनु रास –
संकटाशी टक्कर देऊन ध्येय गाठण्यामध्ये तुम्ही आघाडीवर राहाल.
मकर रास –
संततीच्या प्रगतीचा आलेख उंचावेल ज्या गतीने पैसा हाती येणे आवश्यक आहे तो न आल्यामुळे थोडी चिंता लागेल.
कुंभ रास –
कर्माच्या बाबतीत भाग्याची साथ असल्यामुळे काळजी करू नका पण कष्टाला पर्याय नाही हेही तितकेच खरे आहे.
मीन रास –
महिलांना पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल मुलांच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये सुधारणा झाल्याचे लक्षात येईल.




Total Users : 609058