श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-जिल्हाभरात सध्या तोतया पत्रकारांनी धुमाकूळ घातलेला आहे. अशीच एक घटना राहाता तालुक्यातील ममदापूर येथे घडली. सदरच्या घटनेमध्ये तोयता पत्रकाराने एका जणास लाख रूपयांची मागणी केली.
संबंधित व्यक्तीने ही रक्कम देण्यास नकार दिल्याने त्यांनी तोतया महिला पत्रकारांना पुढे केले. त्यामुळे संतप्त झालेल्या या व्यक्तीने आपल्या नातेवाईकांना या घटनेबाबत माहिती दिली. नातेवाईक तत्काळ ममदापूर येथे पोहचले. यानंतर या तोतया पत्रकारांची चौकशी सुरू झाली. परंतु त्यांच्याकडे शासन मान्यात वृत्तपत्रांचे अधिकृत ओळखपत्र आढळून आले नाही.
सदरचा पत्रकार हा एका सामाजिक संघटनेचा पदाधिकारी आहे. याबाबत लोणी पोलिसांना काही जणांनी माहिती कळविली. यानंतर या ठिकाणी पोलिसही दाखल झाले. त्यांनीही या पत्रकारांकडे चौकशी केली. याबाबत लोणी पोलिस ठाण्यात कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्हती.
गेल्या अनेक दिवसापासून ‘ दैनिक जनता आवाज’ तोतया पत्रकार बद्दलच्या बातम्या वारंवार प्रसिद्ध केल्या आहे. कोणत्याही शासकीय कार्यालय अथवा पोलीस स्टेशन यांनी पत्रकारांना प्रेस नोट देताना तो अधिकृत पत्रकार आहे की नाही याची शहानिशा करावी. त्यानंतरच प्रेस नोट द्यावी




Total Users : 610091