spot_img
spot_img

जिल्हा बँकेच्या चेअरमन निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग! माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजीत देशमुख यांची सुपा येथील विश्रामगृहावर खा. नीलेश लंके यांची भेट

सुपा (जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमन पदाची निवड गुरुवारी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

संगमनेर सोसायटी मतदारसंघाचे नवनिर्वाचित संचालक तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजीत देशमुख यांनी आज सुपा येथील विश्रामगृहावर खासदार नीलेश लंके यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये चर्चा झाली.

जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चेअरमन पदाच्या निवडीपूर्वी झालेल्या या चर्चेत नेमके कोणते राजकीय गणित मांडले गेले? बँकेच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे!

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!