श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर येथे कबूतर चोरीचा कोणताही गुन्हा दाखल नसताना चार जणांना सांगून मारणे त्याचबरोबर त्यांचे मनोबल कशाला तुटेल अशी वागणूक देणे ही अत्यंत दुःखद घटना आहे त्यामुळे या ओह होण्यातील आरोपींना विरोधात मोका अथवा एमपीडीए अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी करून बिहार उत्तर प्रदेश प्रमाणे पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्रात अशा घटना घडायला लागले दुर्दैवी असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले
हरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी आज जखमी मुलांची भेट घेतली त्यानंतर खरेगाव येथे जाऊन ग्रामस्थांची संवाद साधला त्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद देत त्यांनी वरील प्रमाणे मत मांडले. यावेळी शरद आंबेडकर, राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते फारूक शेख, उपाध्यक्ष दिशा शेख, अमित भुईंगल, राज्य समन्वय डॉ.अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष शरद खरात, विशाल कोळगे, तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन, सुमित पडवळ, किशोर ठोकळे आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, एका मुलाच्या उजव्या पायाच्या खाली संवेदना नाही तरी एक अजूनही विधीतून बाहेर पडलेला नाही जखमींवर व्यवस्थित उपचार सुरू असले तरी त्यांना मानसोपचार तज्ञाकडून उपचाराची गरज आहे.
अनेक जंगली आपण समाजाची उदासीनता दिसते मात्र योग्य ती कारवाई झालेली आहे धर्म जात बघण्यापेक्षा माणूस म्हणून माणसावर केलेल्या अत्याचाराचा समाजाच्या प्रत्येक घटकातून व्यक्त होत गेला ही सकारात्मक बाबा असून काही राजकीय मंडळी मात्र याला अपवाद आहेत.
गेल्या तीन ते चार महिन्यात आरोपींच्या संपर्कात कोण कोण आले याची यादी पोलिसांनी तयार करावी कारण कोणताही ठासून भरल्याशिवाय अशी कृत्य कोणी करणार नाही हे संपर्कात आलेल्या व्यक्ती कोणत्या संघटनेच्या याचा शोध लावला पाहिजे ही कामे मनोरुग्ण असलेली व्यक्तीच करू शकते. काही काळासाठी एखाद्या व्यक्तीचा मेंदू घटनांसाठी तयार करायचा युपी बिहार हरियाणा आधी राज्यात असलेले प्रकार महाराष्ट्रात आलेला आहे अशी शंका घेण्यास वाव असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले



