राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- भाजप सरकार ला सत्तेची गुर्मी आला असे प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तन पुरे यांनी केले आहे.
रविवारी राहुरी येथे पत्रकार परिषद त्यावेळी ते बोलत होते या सरकार ला जनतेचे काही घेणे देणे नाही.त्यांच्याजवळ आमदार फोडणे हेच त्यांचे धोरण आहे या सरकारचे कामाकडे लक्ष नाही आजुन शेतकऱ्याला मागील आपत्तीचे आनुदान आले नाही .
आमच्या काळात कोळसा टंचाई असताना आम्ही वीज कपात केली नाही अशी जुलमी लोडशिफिंग हे करत आहे या सरकार ला गुर्मी आहे त्यांची मस्ती उतरवण्याचे काम पुढील काळात करणार आहे असे प्रतिपादन आमदार तनपुरे यांनी केले.
जालना येथील अंतरावली सराटी येथील मराठी समाजने संविधानाच्या घरूनआंदोलन सुरू केले परंतु शासन आपल्या दारी हा कार्यक्रम या भागात होणार होता या कार्यक्रमाला अडथळा येऊ नये म्हणून मराठा समाजाचे आंदोलन गृह विभागाने लाठीमार करण्याचे आदेश दिले अशी माहिती समजते यामध्ये निरपराध आंदोलकांना निर्दयीपणे मारहाण करून ही गृहमंत्री फडणवीस हे राजकारण करत आहेत गृह खात्याची मोठी चूक आहे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे



