श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा ):-श्रीरामपूर अपुरा पाऊस आणि खंडीत वीज पुरवठा यामुळे खरीपाची पिके जळून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी श्रीरामपूर शिवसेना विधानसभा मतदार संघाच्यावतीने करण्यात आली.
उध्दव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) च्यावतीने तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या म गणीसाठी तहसील कार्यालयासम र आंदोलन करत निवेदन देण्यात आले.
यावेळी मा. आ. भाउसाहेब बोलताना कांबळे म्हणाले, तालुक्यात तीन महिने झाले तरी पाऊस नाही. पाण्याची पातळी खालावली आहे. पाऊस नसल्यामुळे शेतातील उभी पिके जळून जावून शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च वाया गेला आहे. त्यात वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने आणखीनच मोठे संकट उभे राहिले आहे. अशास्थितीत हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, असे त्या म्हणाल्या.
संजय छल्लारे म्हणाले, सरकारी अधिकाऱ्यांनी कार्यालयातून पंचनामे न करतान थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पंचनामे करावेत, तसेच शेतकऱ्यांना संकटात लोटणाऱ्या शिंदे सरकारच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत शेतकरी असून अध्यापही शिंदे सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नसल्याने शेतकरी वर्गात कमालीचे संताप व्यक्त होत आहे. शिंदे सरकारने त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावे व न्याय द्यावा अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गामधून होत आहे. अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही, तर वंचित शेतकऱ्यांसह ठाकरे शिवसेना तहसील कार्यालयासमोर शिवसेना स्टाईल आंदोलन करणार असल्याचा पुनरुच्चार संजय छल्लारे यांनी केला.
याप्रसंगी अशोकमामा थोरे, सदा कराड, सचिन बडदे, बोरकर मामा, प्रदिप वाघ, अतुल शेटे, शेखर दुबैय्या यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुधीर वायखिंडे, भगवान उपाध्ये, तेजस बोरावके, राजेंद्र बोरसे, संजय साळवे, अरुण पाटील, शिवा पानसरे, अशोक पवार, शुभम ताके, विजय बडाख, प्रतिक यादव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उध्दव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) च्यावतीने तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या म गणीसाठी तहसील कार्यालयासम र आंदोलन करत निवेदन देण्यात आले.
यावेळी मा. आ. भाउसाहेब कांबळे म्हणाले, तालुक्यात तीन महिने झाले तरी पाऊस नाही. पाण्याची पातळी खालावली आहे. पाऊस नसल्यामुळे शेतातील उभी पिके जळून जावून शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च वाया गेला आहे. त्यात वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने आणखीनच मोठे संकट उभे राहिले आहे. अशास्थितीत हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, असे त्या म्हणाल्या.