spot_img
spot_img

किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या अंमलबजावणीत बँकाची सकारात्मक भूमिका आवश्यक-ना.विखे

मुंबई दि.४( जनता आवाज वृत्तसेवा ):- किसान  क्रेडिट कार्ड योजना सर्व भारतीय बँका, जिल्हा सहकारी आणि ग्रामीण बँकांमार्फत उपलब्‍ध आहे. या योजनेत अधिकाधिक कृषी, मत्स्य व्यवसाय आणि पशुपालन क्षेत्रातील शेतकऱ्यांना सामावून घेत त्यांच्या कर्जाच्या गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत बँकाची सकारात्मक भूमिका आवश्यक असलयाचे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

किसान क्रेडिट कार्ड यावर आधारीत राष्ट्रीय चर्चासत्र आज सकाळी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय एल. मुरुगन, केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. विखे- पाटील म्हणाले की, किसान क्रेडिट कार्ड योजना या विषयावर पहिल्यांदाच अशा प्रकराचे राष्ट्रीय चर्चासत्र मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणे ही बाब अत्यंत स्तुत्य आहे. केंद्रीय केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री यांनी मच्छिमार करणारे आणि पशुपालन करणारे शेतकरी यांना या योजनेअंतर्गत अधिकाधिक लाभ कसे मिळतील यासाठी प्रयत्न करत आहेत. येणाऱ्या काळात नाबार्डसह बँकांनी आपली भूमिका सकारात्मक ठेवून या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना कसा मिळेल यावर लक्ष देणे आवश्यक आहे. ही योजना केंद्र शासनाची महत्वपूर्ण योजना आहे जी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देते. अलीकडेच पशुपालक आणि मच्छीमारांचाही किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेचा दुग्धउत्पादन करणारे आणि मत्स्यपालन शेतकऱ्यांनी अधिकाधिक फायदा करुन घेणे गरजेचे आहे.

राज्य शासनाने दुग्ध उत्पादन वाढीवर भर दिला असून विदर्भातील 11 जिल्हयांमध्ये दुग्ध उत्पादनावर अधिक भर दिला आहे. पशुपालन आणि दुग्धउत्पादन शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविणे, उत्पादनक्षमता वाढविणे यावर येत्या काळात भर देण्यात येणार असल्याचेही श्री. विखे- पाटील यांनी सांगितले.

किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना शेतकर्‍यांना अल्पकालीन औपचारिक कर्ज देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आणि नाबार्ड (कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक) द्वारे तयार करण्यात आली. कृषी, मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जाच्या गरजा पूर्ण केल्या जात असल्याची खात्री करण्यासाठी KCC योजना सुरू करण्यात आली. हि योजना त्यांना अल्प-मुदतीचे कर्ज मिळवून देण्यासाठी आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि त्यांच्या इतर खर्चासाठी क्रेडिट मर्यादा प्रदान करून मदत करते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!