माळवाडगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण ग्रामपंचायतने RO फिल्टरचे काम लवकर पूर्ण न केल्यास ग्रामपंचायतला बेमुदत टाळे ठोकण्याचा इशारा गावाकऱ्यांनी काल निवेदनाद्वारे पंचायत समितीला दिला आहे भामाठाण गावातील पाणी पुरवठा विहीरचे पाणी पहिल्यापासूनचं दूषित असल्या कारणामुळे भामाठाण ग्रामपंचायत ने निरोगी पाणी मिळण्यासाठी RO फिल्टर बसवला आहे.
पण हा RO फिल्टर गेल्या 20 ते 25 दिवसांपासून बंद असल्या कारणाने गावाकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत आहे पण ज्या कुटुंबाला ही भटकंती करणे शक्य नाही अश्या कुटुंबातील लहान मुळे, वयोरुद्ध व कुटुंबातील सर्व माणसांना पोटदुखी,जुलाब,उलट्या, साथीचे आजार अश्या आरोग्याच्या तक्रारारीला सामोरे जावे लागत आहे अश्या अशयाचे निवेदन पंचायत समती श्रीरामपूर यांना काल देण्यात आले आहे व त्यात म्हंटले आहे की जर येत्या 14 सप्टेंबर 2023 पर्यंत जर RO फिल्टर दुरुस्त केला नाही व विहरीच्या पाण्याचा तसेच RO फिल्टरच्या पाण्याचा T.D.S. चेक करून जर लवकरात लवकर गावकर्याच्या समस्या सोडवल्या नाहीत तर दिनांक 15 सप्टेंबर 2023 पासून भामठाण ग्रामपंचायत ला सर्व गावाकऱ्यांच्या वतीने बेमुदत बंद करण्यात (टाळे ठोकण्यात) येईल असे.ह्या पत्रात वर्णन केले आहे हे निवेदन पंचायत समिती वतीने अधिकारी रोकडे मॅडम यांनी गावकर्यांकडून देण्यात आले . या वेळी राजेंद्र भा.बनसोडे,रामनाथ सांगळे,दादाभाऊ गोरे,सुनील बनसोडे,अशोक मुठे,कचरु बनसोडे यांनी निवेदन गावकर्यांच्या वतीने दिले.
पाणी पुरवठा विहरीचे पाणी हे दूषित आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायतने RO फिल्टर बसवला आहे तरी पण नवीन होणाऱ्या जलजीवन पाणी योजनेचा नवीन उद्भव पाणीपुरवठा विहरी पासून केवळ 500 फुटावरच सुचवण्यात आला आहे त्यामुळे पुन्हा गावकर्याणला ह्याच अडचणीला सामोरे जावे लागू शकते ? जर ह्या उद्भवाची जगा बदल्यास ह्या अडचणी दूर होऊ शकतात.



