लोणी दि.१३ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी संवाद ही काळाची गरज आहे संवादामुळे स्वतःचे न्यूनगंड कमी होऊन व्यक्तीमत्व विकासाला चालना मिळते कृतिशील व्यक्तीस प्रत्येक अडचणींमध्ये संधी दिसते तर कृतीहीन व्यक्तीस प्रत्येक संधी मध्ये अडचण असते. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढे तुमचे यश बहुमूल्य असे प्रतिपादन राम गुडगीला यांनी केले.
लोणी पायरेन्स आयबीएमए येथे आयोजित दीक्षारंभ २०२३ इंडक्शन आणि ओरिएंटेशन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास पायरेन्स चे संचालक डॉ.निलेश बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पाबला इराझ ,कुणाल क्षीरसागर ,समीर नाईक, डॉ. मनोजकुमार लंगोटे प्रा. प्रमोद बोऱ्हाडे डॉ. सतीश बिडगर प्रा.धनंजय बोऱ्हाडे प्रा. योगेश आहेर प्रा. पूजा परजने प्रा. रेणुका तनपुरे प्रा. ऋषिकेश धर्माधिकारी प्रा.रणिता वलवे आदीसह एम बी ए, एमसीए, बी व्होक या अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोतलांना डाॅ.निलेश बनकर म्हणाले,एखाद्या विशिष्ट क्षेत्रात प्राविण्य असणे हे तुमच्या करिअरमध्ये आणि जीवनाच्या इतर क्षेत्रांमध्ये मोठ्या यशाचे गमक असू शकते कोणतेही काम यशस्वीपणे करायचे असेल ते तर ते काम करण्याची ज्ञान क्षमता आणि योग्यता आपल्यात असली पाहिजे कौशल्य विकासाचे मुख्य उद्दिष्ट व्यक्तीची कार्य करण्याची क्षमता सुधारणे व्यक्तीमध्ये स्वतः स्वरूपात असलेल्या प्रतिभा शोधून काढणे व व्यक्तीच्या सर्वांगीण विकासास पूरक अशा कौशल्यांचा विकास करणे योग्य तज्ञ व्यक्तीचे प्रशिक्षण याद्वारे ते सुलभ होते असे डॉ.निलेश बनकर म्हणाले प्रारंभी आय बी एम ए चे संचालक डॉ मोहसीन तांबोळी यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला.



